Bigg Boss Marathi season 5 Update : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात एका मागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. यंदाच्या या पर्वात रील स्टार यांची धमाल मस्ती पाहायला मिळत आहे. रील स्टार यांच्या दमदार एण्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामध्ये टिक टॉक स्टार सूरज चव्हाणची एण्ट्री अनेकांना भावली आहे. सूरज चव्हाणच्या एण्ट्रीनंतर ‘बिग बॉस’मधील स्पर्धकांना ते आवडलं नाही. सुरुवातीला सूरज स्पर्धकांशी बोलायला, त्यांच्याशी जुळवून घ्यायला घाबरत होता हे पाहून स्वतः ‘बिग बॉस’ यांनीच सूरजला खेळ खेळायला उत्स्फूर्त केलं.
सूरजला ‘बिग बॉस’ एका बंद खोलीत बोलावतात आणि सांगतात की, “सूरज न घाबरता खेळायचं”. सूरजला ‘बिग बॉस’ यांनी खंबीर होण्यास आणि हा खेळण्यास धीर दिलेला आहे. यावर सूरज असं म्हणतो, “आता मी कोणाला घाबरणार नाही. कारण जो घेतो टीम तो होतो किंग. कारण मी आहे गोलीगत टॉपचा किंग”, असं म्हणत तो त्याच्या युनिक स्टाइलने पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात एण्ट्री घेतो. सूरजचा हा बदलता स्वभाव आता घरातील इतर स्पर्धकांना भारी पडणार आहे.
नुकत्याच समोर आलेल्या भागात असं पाहायला मिळत आहे की, निक्की सूरजला म्हणते, “हे मेकअपचं सामान जरा तिकडे घेऊन चल ना. तिकडे म्हणजे वॉशरुममध्ये”. हे ऐकून सूरज म्हणतो, “अगं इथेच असुदे. खाली बसून तू इथेच मेकअप कर. हे आपलं घर आहे”. यावर निक्की त्याला सांगते की, “मी शॉर्ट्स म्हणजे छोटे कपडे घातले आहेत म्हणून मी खाली बसू शकत नाही. चल ना हे जरा पडेल”.
यावर सूरज तिला म्हणतो, “शॉर्ट्स मोठे घालत जा”. तेव्हा निक्की मेकअपचा एक पाऊच घेऊन सूरजजवळ येते आणि म्हणते, “सर्व नको हे एक पकड”. त्यावर सूरज उत्तर देत म्हणतो, “तुझी काम तूच करत जा”. यावर धनंजय सूरजचं कौतुक करत म्हणतो, “हे एकदम तू बरोबर बोलला आहेस”. तेव्हा निक्की सूरजला म्हणते, “हे माझं वैयक्तिक काम आहे. घराचं नाही आहे”. तेव्हा सूरज निक्कीला तोडीस तोड उत्तर देत म्हणतो, “वैयक्तिक कामं स्वतःची स्वतः करायची. घराचं असतं तर मी स्वतः तुझ्याबरोबर आलो असतो”.