Bigg Boss Marathi 5 riteish deshmukh : टेलिव्हिजनचा सर्वात मोठा कार्यक्रम अर्थात ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाची सर्वत्र चांगलीच हवा सुरु आहे. रितेश भाऊची हटके स्टाईल आणि १६ सदस्यांचा हटके खेळ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. काहीच तासांत यंदाच्या सीझनचा पहिला ‘भाऊचा धक्का’ पार पडणार आहे. या ‘भाऊच्या धक्क्या’वर सदस्यांची पोलखोल होणार आहे. पण त्याआधीच ‘भाऊचा धक्का’ हे गाणं ‘बिग बॉस’प्रेमींच्या भेटीला आलं आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन पूर्णपणे वेगळा आहे. रितेश भाऊ त्याच्या स्टाईलने कल्ला करत यंदाचा सीझन रंगवताना दिसत आहे.
आता आपल्या हक्काच्या भाऊच्या धक्क्यावर भाष्य करणारं एक नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. रितेश भाऊ कोणाची शाळा घेईल तर कोणाचं कौतुक करेल. एकंदरीतच भाऊच्या धक्क्यावर तो स्पर्धकांचा हिशोब घेणार आहे. त्यामुळे अर्थात कल्ला तर होणारच आहे. एकूणच या भाऊच्या धक्क्यात घेतल्या जाणाऱ्या शाळेत रितेश स्पर्धकांची पोलखोल करत त्यांना आरसा दाखवण्याचे कामं करणार आहे. रितेश आता योग्य तो न्याय देत स्पर्धकांची कानउघडणी करणार का याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या ५व्या पर्वाचा पहिला भाऊचा धक्का प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पहिल्या आठवड्यात कोणत्या स्पर्धकांचं योग्य होतं, कोण चुकलं, कोणी कोणासाठी अपशब्द वापरला अशा सर्व स्पर्धकांना तो सुनावणार का? याकडे प्रेक्षक मंडळी डोळे लावून बसले आहेत. दरम्यान यंदाच्या पर्वात ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकरही स्पर्धक म्हणून आहेत. त्यांचा इतर स्पर्धकांकडून झालेला अपमान काहींना सहनही झाला नाही आहे.
दरम्यान, या पोस्टवर अनेकांनी कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांनी कमेंट करत यंदाच्या या भाऊच्या धक्क्यामध्ये तो योग्य तो न्याय देईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. “तुमच्याकडून सर आज खूप अपेक्षा आहेत. जरी वर्षां ताईच्या चुका झाल्या असतील पण इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं हे योग्य नाही आणि त्याला तुम्ही चुकीचं ठरवू शकाल हिच आशा”, “आज तर सगळ्यांची हवा टाइट होणार”, “आजच्या व उद्याच्या भागाची उत्सुकता आहे”, “कडक रितेश भाऊ”, “हे एवढे करण्यापेक्षा वर्षा मॅडमचा अपमान केलेल्या त्या निक्कीला सरळ कर. नुसता धक्का देऊ नकोस”, असं म्हंटल आहे.