Kapil Honrao On Trolling : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून सुरु झाली असून या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. या मालिकेमुळे अभिनेता कपिल होनरावला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर कपिल बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस मराठी’ विजेता सूरज चव्हाणबाबत कपिलने केलेलं भाष्य चर्चेत आलेलं पाहायला मिळालं. सूरजच्या विजयावर कपिलने पोस्ट शेअर करताच त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
यानंतर आता कपिल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकतीच कपिलने त्याच्या पत्नीसह करवा चौथ साजरी केली. हे पाहून नेटकऱ्यांनी मराठी माणसं करवा चौथ साजरी करत नाहीत असं म्हणत कपिलला सुनावलं आहे. यावर आता थेट कपिलनेही पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिलं आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट करत, “अरे आपल्यात नाही करत भैय्यालोक करतात”, “मराठी संस्कृती विसरत चाललेत हे लोक. काहीपण करत असतात”, असं म्हणत अभिनेत्याला डिवचलं.
आणखी वाचा – हिरवा चुडा, पारंपरिक लूक अन्…; नागा चैतन्य व शोभिता धुलिपालाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, फोटो समोर
यावर उत्तर देत कपिलने पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “आज काल लोकांना काय झालंय काय माहीत. तुम्ही मराठी कलाकार असे झालेत तसे झालेत. इथे मराठीमध्ये हे करत नाही ते करत नाही. ही कमेंट करण्याआधी सत्य परिस्थिती जाणून घ्या. या लोकांचा वीट आलाय यार. माझी बायको नॉर्थ साइडची आहे. हिंदी भाषिक आहे. करवा चौथ हा तिचा सण आहे. जसे ती माझ्याबरोबर मराठी सण साजरे करते तसा हा सण पण मी तिच्यासाठी करतो. तिला मारुन, तिचा अपमान करुन हे मराठीमध्ये नाही करत तर नाही करायचं?, माझी महान मराठी परंपरा, मराठी संस्कृती आहे हे नाही करायचं, असं नाही ना बोलू शकत. तुमची अक्कल वापरा. हे माझं वैयक्तिक आयुष्य आहे”.
आणखी वाचा – Appi Aamchi Collector : अमोलमुळे अप्पी-अर्जुनमध्ये जवळीक, पुन्हा बहरणार प्रेम, कायमचं एकत्र येणार का?

या कपिलच्या पोस्टवरही त्याला एका नेटकऱ्याने उत्तर देत म्हटलं की, “उगाच ट्रोल होवू अशा पोस्ट टाकायच्या. कुठल्या तरी कारणाने चर्चेत राहील पाहिजे हाच हेतू असावा. पहिलं सूरजचं झालं म्हणे त्याने स्ट्रगल केला नाही आम्ही खूप केला. मग त्यालाच फिल्म का तोच का विजेता. ते त्याच नशीब होतं. त्याच्या स्वभावाने जिंकला. चर्चेत राहायचं आहे तर मग हे असं पुन्हा सारवा सारव करु नका”.