कलाकारांसाठी त्यांचे चाहते वेडे असतात. एखादा कलाकार योगायोगाने जर समोर आला तर चाहते त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करतात. त्या कलाकाराप्रती असलेलं प्रेम, त्याच्या अभिनयाच केलं जाणार भरभरून कौतुक या दरम्यान बरीच कलाकार मंडळी भावुक होतात, वा स्वतः चाहतेही भावुक होतात. असाच एक किस्सा नुकताच समोर आलाय तो म्हणजे बाईपण भारी देवा चित्रपटातील कलाकारांसोबतचा.(Sukanya Mone Emotional)
बाईपण भारी देवा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. या चित्रपटातील कलाकार मंडळी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगल्याच व्यस्त आहेत. सहा बहिणींभोवती फिरणार हे बाईपण भारी देवाचं कथानक समस्त महिला वर्गाने चांगलंच उचलून धरलं आहे. विकेंडला तर महिला वर्गाने या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद दिला. यावेळी चित्रपटातील कलाकार मंडळींनी थेट चित्रपटगृहात जाऊन चाहत्यांना, प्रेक्षकांना भेट दिली. या चित्रपटाच्या पुण्यातील प्रीमियर शो ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
पाहा सुकन्या भावे यांना का झाले अश्रू अनावर (Sukanya Mone Emotional)
चित्रपट पाहून झाल्यावर कलाकार मंडळींसोबत प्रेक्षकांनी संवाद साधला याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान गाजतोय. कलाकारांसमोर प्रेक्षकांनी केलेलं तोंडभरून कौतुक पाहता अभिनेत्री सुकन्या मोने या भावुक झालेल्या दिसल्या आहेत.(Sukanya Mone Emotional)
हे देखील वाचा – थेट लंडनला घेतला गुरुसख्याचा आशीर्वाद, काय आहे प्रवीण तरडे यांच्या पत्नीचा किस्सा जाणून घ्या
प्रत्येक महिलेचं अस्तित्व जोपासणारा हा चित्रपट मनाचा ठाव घ्यायला कुठेही कमी पडत नाही आहे. दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, वंदना गुप्ते, दीपा परब पाहायला मिळत आहेत.
