छोट्या पडद्यावरील “सारेगमप लिटिल चॅम्प्स” या सिंगिंग रिऍलिटी शोमधून घराघरात पोहोचलेले सर्वांचे लाडके गायक मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांनी नुकतीच आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर अनेक कलाकार व चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला.(Prathmesh Laghate Mugdha Vaishampayan)
मुग्धा व प्रथमेश हे दोघं एकमेकांना लिटिल चॅम्प्सपासून ओळखत असले, तरी शोनंतर अनेक वर्षांपासून ते एकत्र कार्यक्रम करतायत. दोघांमधील बॉण्डिंग छान असून गेल्या तीन ते चार वर्षांपासून डेट करत असल्याचेही त्यांनी सांगितलंय. आता मुग्धा व प्रथमेश आपल्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नाची उत्तरे देत असून याचा व्हिडिओ नुकतंच समोर आलाय. या व्हिडिओमध्ये चाहत्यांच्या प्रश्नाची उत्तरे देताना मुग्धाने एक मोठा खुलासा केला, ज्यात मुग्धा प्रथमेशला चक्क या नावाने हाक मारायची. नेमकी मुग्धा काय म्हणाली, ते पाहूया या व्हिडिओमध्ये.
मुग्धा व प्रथमेश यांचा एकत्र व्हिडिओ काही दिवसांपूर्वी मुग्धाच्या युट्युब चॅनेलवर आला. त्याचा दुसरा भाग काल प्रथमेशच्या युट्युब चॅनेलवर रिलीज झाला. ज्यात एका चाहत्याने मुग्धा व प्रथमेश एकमेकांना कोणत्या नावाने हाक मारायचे, असा प्रश्न विचारला. यावर मुग्धा हसत म्हणाली, की “मला सांगायला खरंतर खूप मज्जा येतेय. खूपच मजेशीर हे कारण मी याला ‘प्रथमेश दादा’ म्हणायची”. त्यावर प्रथमेशने लगेच “मुग्धाबरोबर कार्तिकीही मला दादा म्हणायची.
फक्त कार्तिकी लवकर प्रथमेश म्हणायला लागली, मुग्धा थोडीशी उशिरा प्रथमेश म्हणायला लागली. पण तो जो तिने घेतलेला वेळ होता, तो कशासाठी घेतला होता हे आता तुम्हाला समजलं असेल.” त्याचबरोबर प्रथमेशनेही याचे उत्तर देताना मुग्धाला तो नावाने हाक मारायचा. त्याचबरोबर आम्ही सगळेच तिला माऊ नावानेही हाक मारायचो, असंही प्रथमेश व्हिडिओत म्हणाला.(Prathmesh Laghate Mugdha Vaishampayan)
मुग्धा व प्रथमेश यांच्या प्रेमाच्या कबुलीनंतर प्रथमेशच्या केळवणाचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यावर मुग्धाही रिऍक्ट झाली होती. दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. पण त्यानंतर या दोघांनी आपण इतक्या लवकर लग्न करणार नसल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वी केला होता.