बॉलिवूड अभिनेत्रींच्या यादीत नेहमीच चर्चेत असलेलं नाव म्हणजे जान्हवी कपूर. जान्हवी तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. सध्या जान्हवी कपूर शिखर पहाडियाला डेट करत असल्याने चर्चेत आहे. मात्र अद्याप दोघांनीही आपलं नातं अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही आणि ते कोणापासून लपवतानाही दिसत नाहीत. जान्हवी प्रत्येक कार्य्रक्रमामध्ये शिखरबरोबर दिसते. जान्हवीने तिच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीत पहिल्यांदा ब्रेकअपबद्दल भाष्य केलं. मासिक पाळी आल्यावर तिचे बॉयफ्रेंडबरोबर ब्रेकअप कसे व्हायचे याबाबत तिने खुलासा केला. (Janhvi Kapoor On Breakup)
जान्हवीने ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिचे हृदय तोडणारी पहिली व्यक्ती पुन्हा तिच्या आयुष्यात आली. “मी आयुष्यात फक्त एकदाच ब्रेकअपचा अनुभव घेतला आहे पण नंतर ती व्यक्ती पुन्हा माझ्या आयुष्यात आली. आणि आता सर्व काही ठीक होते”. जान्हवी म्हणाली, “तिची मासिक पाळी सुरु झाली तेव्हा दर महिन्याला तिचे ब्रेकअप व्हायचे”. जान्हवी पुढे म्हणाली, “माझ्या मासिक पाळीच्या काही वर्षांनंतर मी दर महिन्याला त्या व्यक्तीबरोबर ब्रेकअप करायचे. सुरुवातीचे दोन-तीन महिने तर तो माझ्या अशा वागण्याने शॉकमध्ये होता, पण त्यानंतर तो ठीक आहे असं बोलून माझ्या मतात सहभागी व्हायचा”.
जान्हवी पुढे म्हणाली, “त्यानंतर दोन दिवसांनी मी रडत त्याच्याकडे जायचे आणि त्याची माफी मागायचे. मी असं का वागत आहे हे माझं मलाच कळत नव्हतं. हे अत्यंत टोकाचे होते”. जान्हवीने अखेर तिच्या बॉयफ्रेंडबरोबरच्या नात्याचा खुलासा केला आहे. जान्हवी कपूर व शिखर पहाडिया आधी डेट करत होते आणि नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. मात्र आता पुन्हा ते एकत्र आले आहेत.
जान्हवी व शिखर दोघेही प्रत्येक सोहळ्यामध्ये एकत्र स्पॉट होताना दिसतात. दोघांच्या आउटिंगचे फोटोही रोज व्हायरल होत असतात. अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नाच्या वेळीही जान्हवी तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियासह प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसली.