बाईपण भारी देवा या चित्रपटामुळे अभिनेत्री सुचित्रा बांदेकर सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. या चित्रपटात सुचित्रा यांची अगदी वेगळी भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील त्यांचा लूकही अगदी हटके आहे. या चित्रपटात सुचित्रा यांच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तसेच चित्रपटाच्या शेवटी चित्रपटातील नवऱ्याबद्दल त्या काय निर्णय घेतात हेही प्रेक्षकांना पाहायला मिळतं.(Suchitra Bandekar Incident)
नुकत्याच एका मुलाखतीत सुचित्रा यांनी खऱ्या आयुष्यातल्या भूमिकेसोबत त्या चित्रपटातल्या भूमिकेशी रिलेट करू शकल्या आहेत का याबाबत भाष्य केलं आहे. या भूमिकेशी त्या किती रिलेट करू शकल्या असा प्रश्न त्यांना विचारला
पाहा विवाहबाह्य संबंधावर काय म्हणाल्या सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar Incident)
तेव्हा त्या म्हणाल्या, “तिची भूमिका बघून मी रिलेट करू शकले पण तिची गोष्ट मी माझ्या आयुष्याशी रिलेट करू शकले नाही. कारण आदेश खूप चांगला आहे. तो लफडी वगैरे करत नाही किंवा त्या वाट्याला कधी जातही नाही. नाहीतर चित्रपटातील पल्लवी जशी रिॲक्ट झाली आहे त्यापेक्षा चौपट मी रिॲक्ट होईन हे आदेशला माहीत आहे.” सुचित्रा बांदेकर यांनी दिलेलं हे मजेशीर उत्तर खूप चर्चेत आलं आहे.(Suchitra Bandekar Incident)
हे देखील वाचा – रसिका वेंगुर्लेकरचा नवा सिनेमा झळकणार प्रसाद ओक सोबत
‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपटगृहात खूप चांगली कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटाने तब्बल कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटात सुचित्रा बांदेकर यांच्यासह रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने, दीपा परब या कलाकारांना पाहणं रंजक ठरलं. तर चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी दिग्दर्शनाची उत्तम बाजू सांभाळली आहे.
