महाराष्ट्रात सध्या एकाच सिनेमाची जोरदार हवा आहे. ती म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे यांचा नुकतंच रिलीज झालेला ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाची. सहा बहिणींच्या अवतीभवती फिरणारा हा सिनेमा राज्यभरासह देश-विदेशातील महिलांनी अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. सिनेमा रिलीज होऊन केवळ दोन आठवडे झालेत, पण सिनेमाला मिळणार प्रेक्षकांचा प्रतिसाद अजूनही वाढतच चालला आहे. आता सिनेमाच्या आतापर्यंतचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलेलं असून सिनेमाने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केलाय. (Baipan Bhari Deva Blockbuster)
रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दिपा परब ह्या सहा अभिनेत्रींच्या सुंदर अभिनयाने सजलेल्या या सिनेमाने आतापर्यंत २८.९८ कोटींची घसघशीत कमाई केली असून एकाच दिवसात तब्बल ६.१० कोटींची कमाई करत ‘सैराट’ व ‘वेड’ सिनेमाचा विक्रम तोडला. याआधी सिनेमाने पहिल्याच वीकेंडमध्ये ६.४५ कोटींची कमाई करत वर्षातील सर्वाधिक ओपनिंग करणारा मराठी सिनेमा ठरला होता. विशेष म्हणजे ह्या वीकेंडमध्ये ११.३८ कोटींची कमाई केली असून सिनेमा लवकरच ५० कोटींचा टप्पा पार करणार असल्याचं समीक्षकांकडून सांगण्यात येतंय.
पाहा चित्रपट हिट होताच केदार शिंदे काय म्हणाले (Baipan Bhari Deva Blockbuster)
दिग्दर्शक केदार शिंदे हे यश पाहून भारावले आहेत. इंस्टाग्रामवर त्यांनी एक पोस्टर शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानत म्हणाले, “नि:शब्द.. काही घटना आयुष्यात घडतात त्या फक्त आनंद व्यक्त करण्यासाठी. हे सगळं अनाकलनीय आहे. त्यावर निर्विवाद वर्चस्व आहे ते.. मायबाप प्रेक्षकांचं. त्या परमेश्वराचा आशिर्वाद.. हा सिनेमा आता आमचा राहीला नाही. तो प्रेक्षकांचा झाला आहे. अनेक विक्रम प्रेक्षकांच्या नावे या सिनेमाने निर्माण करावेत हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. श्री सिध्दीविनायक…”(Baipan Bhari Deva Blockbuster)
हे देखील वाचा – आदेशने विवाहबाह्य संबंध ठेवले तर
अगंबाई अररेच्चा, जत्रा, गलगले निघाले, खो-खो, श्रीमंत दामोदरपंत अश्या दर्जेदार सिनेमांचे दिग्दर्शन करणाऱ्या केदार शिंदे यांचाच ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमा काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता, त्यालाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभला होता. यासह केदार सलग दोन सुपरहिट सिनेमे देणारे आणखीन एक मराठी दिग्दर्शक ठरले.