रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मराठी माणसाला कोणी मोठं झालेलं बघवत नाही”, नितीन देसाईंच्या मृत्यूनंतर सुबोध भावेचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “तो इथे…”

सौरभ जाधवby सौरभ जाधव
ऑगस्ट 5, 2023 | 12:40 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Subodh Bhave on Nitin Desai Death

Subodh Bhave on Nitin Desai Death

Subodh Bhave on Nitin Desai Death : मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध बनवणारे आणि ‘आधुनिक विश्वकर्मा’ म्हणून ख्याती असलेले नितीन देसाई यांनी जगाचा निरोप घेतला. काल(५ ऑगस्ट २०२३) नितीन देसाई यांच्यावर एन. डी. स्टुडिओ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी मनोरंजन विश्वातील सुबोध भावे, मानसी नाईक, अभिजित केळकर, आशुतोष गोवारीकर, अमोल कोल्हे, आदेश बांदेकर या कलाकारांनी अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थिती दर्शवली होती.

अंत्यदर्शनाप्रसंगी नादीं देसाई यांच्या सोबतच्या आठवणी सांगताना अभिनेता सुबोध भावे भावुक झालेला पाहायला मिळाला. पत्रकारांशी संवाद साधताना सुबोध म्हणाला, ” केवळ महाराष्ट्रातीलच न्हवे तर जगातला एक उत्कृष्ट कलाकार गेला. मराठी माणसाने चित्रपटसृष्टीची निर्मिती केल्यानंतर प्रभात असेल, व्ही. शांताराम यांचा राजकमल असेल, भालजींचा जयप्रभा असेल ही सर्व मराठी माणसं स्वतःचा स्टुडिओ, चित्रपट या सर्वांकडे शुद्ध नजरेने बघायची. कालांतराने या गोष्टींमध्ये खंड पडला आणि मग या मध्ये नितीन देसाई आले आणि त्यांनी ही परंपरा पुढे सुरु ठेवली आणि अजून समृद्ध केली. नितीन केवळ मराठी चित्रपट मालिका करून थांबला नाही तर भारतातील असा एक ही दिग्दर्शक नसेल ज्याने नितीन सोबत काम केलं नाही. जोधा अकबर असेल, चाणक्य असेल, लगान असेल यांसारख्या अनेक सेटची निर्मीती त्यांनी केली.

नितीनने पाहिलेल्या स्वप्नांपैकी एक मोठं स्वप्न इथे पूर्ण होणार होतं पण आज तो या स्वप्नाच्या जागी निपचीत पडून आहे हे पाहवत नाही. नितीनच जाणं ही केवळ त्याची हार नाही तर मराठी माणसाची, मनोवृत्तीची हार आहे. आम्ही नाही बघू शकत कोणी मोठं झालेले हे आज नितीनच्या जाण्याने पुन्हा एकदा सिद्ध झालं. नितीनच्या आर्थिक गोष्टींबद्दल मला ठाऊक नाही पण हा स्टुडिओ जप्त होऊ नये म्हणून नीतीची ही घटना घडली असावी. एका महिन्यापूर्वी आम्ही इथेच भेटून फोटो काढले माझ्या आगामी ‘मानापमान’ चित्रपटही काही दृश्य मला इथे शूट करायची होती आणि त्यानिमित्त आम्ही पुन्हा देखील भेटणार होतो. एन. डी. स्टुडिओमध्ये आलो आणि इथे नितीन नसणं ही कल्पनाच करवत नाही.

हे देखील वाचा- …अन् एनडी स्टुडिओमध्ये शांतता पसरली, नितीन देसाईंना मुलीने दिला खांदा, कुटुंबियांना अश्रू अनावर

स्वर्गीय नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्कार विधीं प्रसंगी त्याच्या मोठ्या मुलींनी त्यांना खांदा दिला. शिवाय महाराष्ट्र पोलिसांकडून देखील नितीन देसाई यांना शासिकीय पद्धतीने आदरांजली वाहण्यात आली. नितीन देसाई यांच्या अंत्यदर्शनाला बॉलीवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी देखील उपस्थति दर्शवली होती.(nitin desai family in funeral)

Tags: nitin desai deathNitin Desai Funeralnitin desai nd studioSubodh Bhave on Nitin Desai Death
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Rinku Rajguru Troll

रिंकु राजगुरुने आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं नाटक, फोटो पोस्ट करताच नेटकरी भडकले, म्हणाले, “मराठी कलाकारांनाच…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.