शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सुभेदार’नंतर दिग्पाल लांजेकर यांचा नवा चित्रपट, मोठ्या पडद्यावर अवतरणार छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 25, 2023 | 2:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Digpal Lanjekar next Movie

'सुभेदार'नंतर दिग्पाल लांजेकर यांचा नवा चित्रपट

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व मराठी साम्राज्यासाठी त्यांनी दिलेला लढा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. अचूक रणनीती व चाणाक्ष बुद्धीच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या आहेत. महाराजांच्या प्रत्येक मोहिमेत त्यांच्या शूरवीर मावळ्यांची खंबीर साथ लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांची ही गौरवशाली गाथा जगभरात सांगितली जाते. छत्रपती संभाजी महाराजांनीही आपल्या वडिलांप्रमाणे अनेक पराक्रमे गाजवली आहे. त्यांचा हाच पराक्रम प्रेक्षकांना लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. (Digpal Lanjekar next Movie)

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपतींचा गौरवशाली इतिहास रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. ‘श्री शिवराज अष्टक’ या चित्रमालिकेद्वारे अनेक चित्रपट त्यांनी रसिक प्रेक्षकांसमोर आणली आहे. याच मालिकेतील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ काही महिन्यांपूर्वी राज्यभरात प्रदर्शित झाला होता. त्यालादेखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. शिवराज अष्टकमधील आतापर्यंतच्या चित्रपटांना मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी नुकतीच एका चित्रपटाची घोषणा केली.

आजवर ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘सुभेदार’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्पाल लांजेकर लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘शिवरायांचा छावा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातून ते छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्यदिव्य इतिहास उलगडला जाणार आहे. मल्हार पिक्चर्स कंपनी आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे. शिवराज अष्टकमधील चित्रपटांप्रमाणे या चित्रपटातही अनेक बड्या कलाकारांचा भरणा असला, तरी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

हे देखील वाचा – सायली नाहीतर ही सुद्धा निवेदिता-अशोक सराफ यांची मानसकन्या? “मला तुझा अभिमान…”, निवेदिता सराफ यांनी शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत

दरम्यान, दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत याची घोषणा केली आहे. हा पोस्टर शेअर करताना ते म्हणाले, “उजळला तेजाने, पुरंदराचा माथा सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा शत्रू होई परास्त, असा ज्याचा गनिमी कावा शिवशंभूचा अवतार जणू अवतरला ‘शिवरायांचा छावा’! छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट ‘शिवरायांचा छावा’! १६ फेब्रुवारी २०२४ पासून फक्त चित्रपटगृहात!”. चित्रपटाची घोषणा होताच नेटकऱ्यांनी कमेंटद्वारे आपली उत्सुकता दर्शवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

हे देखील वाचा – किरण माने यांनी खरेदी केली त्यांच्या स्वप्नातली आलिशान कार, पोस्ट शेअर करत म्हणाले, “मी जेव्हा तारुण्यात होतो…”

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, तृप्ती तोरडमल, प्रसन्न केळकर, अभिजीत श्वेतचंद्र, विक्रम गायकवाड आदी प्रमुख भूमिका साकारणार आहे. देवदत्त बाजी हे चित्रपटाला संगीत देणार असून वैभव बोरकर आणि किशोर पाटकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०२४ ला राज्यभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Tags: chhatrapati sambhaji maharajdigpal lanjekardigpal lanjekar next movieupcoming marathi movie
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Salman and Shahrukh visits CM Shinde House

बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या 'वर्षा' निवास्थानी पोहोचले बॉलिवूडचे दोन 'खान', तिघांच्या एकत्र फोटोची होतंय जोरदार चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.