बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या ‘वर्षा’ निवास्थानी पोहोचले बॉलिवूडचे दोन ‘खान’, तिघांच्या एकत्र फोटोची होतंय जोरदार चर्चा

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 25, 2023 | 4:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Salman and Shahrukh visits CM Shinde House

सलमान व शाहरुखने घेतले मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचे दर्शन

देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. सार्वजनिक मंडळांसह अनेकांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले. सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकार सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेताना दिसत आहे. त्याबरोबरच ते एकमेकांच्या घरी भेटी देत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले आहे. यावेळी त्यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र सर्वात जास्त चर्चा झाली, ती ‘किंग खान’ शाहरुख खान आणि ‘भाईजान’ सलमान खान यांची. (Salman and Shahrukh visits CM Shinde House)

शाहरुख खान व सलमान खान रविवारी रात्री एकनाथ शिंदेंच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. बाप्पाच्या दर्शनावेळी शाहरुखसह त्याची मॅनेजर पूजा ददलानी उपस्थित होती. तर सलमान बहीण अर्पिता व मेहुणा आयुष शर्माबरोबर आले होते. एकनाथ शिंदेंनी दोन्ही अभिनेत्यांचे शाल व पुष्पगुच्छ देत स्वागत केले. तर मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी दोन्ही अभिनेत्यांना गणपती बाप्पाची मूर्ती भेट दिली. शाहरुखने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता, तर सलमानने लाल रंगाचा कुर्ता परिधान करत हजेरी लावली होती. दोन्ही खानने एकनाथ शिंदेसह एकत्र फोटोशूट केले असून या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा – Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : परिणिती चोप्रा व राघव चड्ढा अखेर अडकले विवाहबंधनात, फोटोज शेअर करत म्हणाली, “या प्रवासाला…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी सलमान, शाहरुखसह जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल, आशा भोसले, बोनी कपूर, रश्मी देसाई, सुनील शेट्टी, पंकज त्रिपाठी, बिग बॉस विजेता एल्विश यादव, शहनाज गिल व अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. याआधी शाहरुख खान त्याच्या कुटुंबासह लालबागच्या राजाचे दर्शनासाठी पोहोचला होता. तर सलमानने एकनाथ शिंदेंसह बहीण अर्पिताच्या घरातील बाप्पाच्या दर्शनासाठी एकत्र आले होते.

हे देखील वाचा – ‘सुभेदार’नंतर दिग्पाल लांजेकर यांचा नवा चित्रपट, मोठ्या पडद्यावर अवतरणार छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम

दोघांच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास, शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई करताना दिसत आहे. तर सलमान ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटात शेवटला दिसला होता. तो लवकरच कतरिना कैफसोबत ‘टायगर ३’मध्ये दिसणार आहे.

Tags: cm eknath shindeganeshotsav 2023Salman and Shahrukh visits CM Shinde Housesalman khanshah rukh khan
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Vaibhav tatwawadi share a video of him birthday

Video: ‘औक्षण, केक आणि मज्जा-मस्ती’, असा साजरा केला मित्रपरिवाराने वैभव तत्तववादीचा वाढदिवस, पोस्ट करत म्हणाला, “प्रत्येक क्षण जगण्यासाठी…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.