Aitraaz Sequel Coming Soon : प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार आणि करीना कपूर खान स्टारर ‘ऐतराज’चा सिक्वेल ‘ऐतराज २’ लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. चित्रपटाबाबतची ही आनंदाची बातमी निर्माता दिग्दर्शक सुभाष घई यांनी बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी दिली. सुभाष घई यांनी २००४ च्या सुपरहिट चित्रपट ‘ऐतराज’ ची झलक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दाखवली. हा फोटो आहे ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनसचा. ज्यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे.
या पोस्टमध्ये प्रियंका चोप्राचे जोरदार कौतुक करण्यात आले आहे आणि लिहिले आहे की, “बोल्ड व ब्युटीफुल प्रियंका चोप्राने धैर्य दाखवले आणि करुन दाखवले. त्यामुळेच २० वर्षांनंतरही ‘ऐतराज’मध्ये तिने साकारलेली व्यक्तिरेखा सिनेप्रेमी विसरु शकलेले नाहीत. ऐतराज माझ्या मुक्ता आर्ट्सने तयार केला आहे. सुरुवातीला ही भूमिका करताना प्रियांकाला संकोच वाटत होता, पण नंतर तिने पूर्ण आत्मविश्वासाने या महिलेचे पात्र साकारले”.
आणखी वाचा – Video : एक्स बॉयफ्रेंडचं लग्न होताच गाणं गाऊ लागली नेहा कक्कर, व्हिडीओ पाहून चाहतेही हैराण, चर्चांना उधाण
जुन्या ‘ऐतराज’चे क्षण आठवल्यानंतर चित्रपट निर्मात्याने ‘ऐतराज’चा दुसरा भाग जाहीर केला. याबाबत बोलताना निर्मात्यांनी लिहिले आहे की, “आता मुक्ता आर्ट्स तीन वर्षांच्या मेहनती आणि उत्कृष्ट स्क्रिप्टसह ‘ऐतराज २’साठी सज्ज आहे”. २००४ मध्ये प्रदर्शित झालेला, हा रोमँटिक-थ्रिलर अब्बास-मस्तान यांनी दिग्दर्शित केला होता आणि सुभाष घई निर्मित होता. चित्रपटाची कथा होती एका माणसाची (अक्षय कुमार) ज्यावर त्याच्या बॉसने (प्रियांका चोप्रा) लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्या व्यक्तीची केस त्याची वकील पत्नी (करीना कपूर) लढते आणि निर्णय त्याच्या (अक्षय कुमारच्या) बाजूने येतो.
आता ‘ऐतराज २’ चित्रपटाची कथा काय असेल आणि पुढच्या भागात कोणती पात्रं असतील, याबाबत अद्याप काहीही समोर आलेलं नाही. मात्र, अक्षय व प्रियंका यांनी २००५ पासून एकत्र काम केलेले नाही. कारण जेव्हा त्यांच्या अफेअरची चर्चा झाली आणि ट्विंकल खन्नाने सेटवर गोंधळ घातला तेव्हापासून दोघांनी बोलणे बंद केले होते.