शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हे होत सुलोचना याचं खर नावं वाचा काय आहे सुलोचना दीदी यांच्या खऱ्या नावाचा किस्सा

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 4, 2023 | 8:16 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Sulochana Latkar Real Name

Sulochana Latkar Real Name

   सुलोचना यांचे मूळ नाव रंगू दिवाण. कोल्हापूरजवळच्या एका खेड्यात त्यांचा जन्म झाला आणि कोल्हापूर काही  चित्रपटात नगण्य अशा, एक्स्ट्राॅच्या भूमिका साकारत त्यांची वाटचाल सुरु झाली. दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या ‘महारथी कर्ण ‘, ‘वाल्मिकी ‘ अशा चित्रपटातही त्यांनी अशाच नगण्य भूमिका साकारल्या. पण त्यांच्याच ‘सासूरवास ‘ या १९४६ सालच्या  चित्रपटात भूमिका साकारत असतानाच त्यांना भालजी पेंढारकर यांनी ‘सुलोचना ‘ हे नाव दिले. पण कसे? तर मूकपटाच्या काळात भालजी पेंढारकर यांच्या ‘बाजबहाद्दूर’ अर्थात ‘राणी रुपमती ‘ या चित्रपटात सुलोचना रुबी मायर्स या अभिनेत्रीने भूमिका साकारली होती तेव्हापासून ‘सुलोचना ‘ हे नाव भालजी पेंढारकर यांच्या अतिशय आवडते झाले होते आणि त्यांनी त्यानंतर  आपल्या बोलपटात भूमिका साकारत असलेल्या नवतारकाना त्यानी सुलोचना हे नाव दिले. (Sulochana Latkar Real Name)

दोन तीनदा असे घडले. पण त्या अभिनेत्री त्यानंतर फारशी वाटचाल करु शकल्या नाहीत. पण त्यांनी ‘रंगू दीवाण ‘ची केलेल्या ‘सुलोचना ‘ यानी  मात्र यश प्राप्त केले. आणि त्यानंतर हे नाव असे काही लोकप्रिय ठरले की मराठी चित्रपटाच्या सोज्वळतेचे प्रतिक म्हणून ‘सुलोचना ‘ ओळखल्या जाऊ लागल्या. 

    आपल्या कारकिर्दीच्या अगदी  सुरुवातीच्या काळात सुलोचनादीदीनी ज्युनियर आर्टिस्ट अथवा एक्स्ट्राॅच्या भूमिका साकारल्या. १९४३ साली कोल्हापुरात निर्माण झालेल्या  मा. विनायक यांच्या ‘चिमुकला संसार ‘ या चित्रपटात त्यांनी तशी भूमिका साकारत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि काही मराठी चित्रपटात एक्स्ट्राॅ म्हणून वाटचाल सुरु असतानाच कोल्हापूर येथे तेव्हा निर्माण झालेल्या तमिळ चित्रपटातही त्यांना अशा पध्दतीच्या कोणताही संवाद नसलेल्या अशा ज्युनियर आर्टिस्टच्याही भूमिका साकारल्या. अशी काहीशी दुर्लक्षित सुरुवात करुनही त्यांनी त्यानंतर घेतलेली झेप अगदी विलक्षण आहे.(Sulochana Latkar Real Name)

लेखक : दिलीप ठाकूर

Tags: entertainmentits majjaSulochana didi deathSulochana LatkarSulochana Latkar Real Name
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
(Aashirwad Tuza Ekvira Aai)

"आशीर्वाद तुजा एकविरा आई" मालिकेत कोळीवाड्यात होणार तानी आणि शिवा चा लग्नसोहळा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.