आपल्या अभिनयाने साऱ्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. एव्हरग्रीन अभिनेते म्हणून अशोक सराफ यांचं उदाहरण दिलं जातं. नाटकं, मालिका, सिनेमा या तीनही क्षेत्रात अशोक सराफ यांनी भरपूर कामगिरी केली आहे. विनोदाचं अचूक टायमिंग, भूमिकेचा सखोल अभ्यास, भूमिका पडद्यावर येईपर्यंत घेतलेली मेहनत पाहता अशोक सराफ यांचे भरपूर फॅन्स आहेत. प्रत्येक चित्रपटातील त्यांच्या भूमिका या विशेष गाजल्या. अशोक सराफ यांनी त्यांच्या ‘मी बहुरूपी’ या पुस्तकात अनेक किस्से सांगितले. यांत त्यांनी त्यांच्या एका चित्रपटातील भूमिकेचं विशेष कौतुक केलं आहे, ती भूमिका आणि तो किस्सा नेमका काय आहे, चला तर पाहुयात आजच्या ‘जपलं ते आपलं’ या भागात. (Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar)
अशोक मामांनी १९९१ साली प्रदर्शित झालेल्या आयत्या घरात घरोबा या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचा किस्सा सांगितला आहे. या चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सुप्रिया पिळगांवकर हे कलाकार दिसले. या चित्रपटात अशोक मामांनी मध्यवर्ती भूमिका साकारली होती. याबद्दल त्यांनी लिहिलं आहे की, “‘आयत्या घरात घरोबा’मध्ये (१९९१) मात्र माझी मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. यातल्या माझ्या व्यक्तिरेखेला जे कंगोरे आहेत ते इतरांच्या व्यक्तिरेखेला नाहीत. हा एक असहाय्य माणूस आहे. राहायला घर नाही, म्हणून मग तो काही महिने एका घरात राहतो तर काही महिने दुसऱ्या.”
पाहा नेमकं सचिन – सुप्रिया कोणाबद्दल बोलले आहेत (Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar)

“त्याचवेळी त्या घराचं नुकसान होणार नाही याची काळजीही तो घेतो. अतिशय सत्शील माणूस. जगण्याची त्याची केविलवाणी धडपड मनाला स्पर्शून जाते. हा माणूस हॅपी गो लकी आहे, मात्र उथळ नाही. त्याच्या मनात गरिबाविषयी कळवळा आहे. स्वत:चं रक्त देऊन त्यातून मिळणाऱ्या पैशांमधून इतरांचं भलं करण्याचं मोठेपण आहे. त्याच्या सगळ्या जगण्यातच एक पॅथॉस आहे. चार्ली चॅप्लिनच्या व्यक्तिरेखांमध्ये असतो तसा.”
हे देखील वाचा – कमल हसन यांच्याबरोबर काम केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, रस्त्यावर आढळला मृतदेह
या सिनेमातलं शेवटचं दृश्य खूप चटका लावणार आहे. हा भगंग, पैशांनी गरीब माणूस जायला निघतो. अत्यंत आनंदानं. आपल्याबरोबर राहणाऱ्यांचं भलं झालं या समाधानात. सचिन आणि सुप्रियाला मोलाचे चार शब्द सांगतो… आणि मग अचानक घशाशी आवंढा येतो तसा रपकून वळतो आणि या दोघांकडे पाठ करून चालू लागतो. त्याच्या पाठमोऱ्या चालीतही प्रेक्षकांना त्याच्या मनातल्या या भावना जाणवणं आवश्यक होतं आणि त्या मी दाखवू शकलो. त्याच्या त्या दूर जाणाऱ्या आकृतीकडे पाहत सचिन सुप्रियाला म्हणतो, ‘तो बघ, जगातला सर्वात सुखी माणूस चाललाय…’
अशोक मामांनी साकारलेल्या त्या भूमिकेचं इतकं हुबेहूब वर्णन केलं की ती भूमिका चटकन डोळ्यसमोर आल्यावाचून राहत नाही.