मनोरंजनविश्व चित्रपट, मालिका, नाटक यांव्यतिरिक्त ओळखलं जातं ते म्हणजे विविध चर्चांसाठी. सध्या सर्वत्र अशीच एक चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री इलियाना डिक्रुझ आणि तिने नुकताच जन्म दिलेल्या बाळाच्या. काही महिन्यांपूर्वी इलियानाने बेबी बंपचे फोटो पोस्ट केले होते मात्र या बाळाचे बाबा कोण हे मात्र गुलदस्त्यात ठेवलं होतं. इलियाना डिक्रुझने १ ऑगस्ट रोजी एका गोड मुलाला जन्म दिला आहे. इलियानाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून तिने जन्म दिलेल्या बाळाचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.(Ileana Dcruz baby)
इलियानाच्या बाळाचे बाबा कोण याबद्दल चाहत्यांनी आधी ही प्रश्न विचारले होते त्यावर इलियानाने कोणतेही उत्तर दिलं न्हवतं. दरम्यान इलियानाच्या या पोस्ट वर अनेक कलाकारांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.(Ileana Dcruz husband)
हे आहे इलियानाच्या मुलाचं नाव
इलियानाने फोटो सोबतच तिने बाळाचं नाव देखील सांगितलं आहे. “‘कोआ फिनिक्स डोलन” असं इलियानाच्या बाळाचं नाव ठेवण्यात आलं आहे. इलियानाने इंस्टारगं अकाउंट वरून शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे “आमच्या लाडक्या मुलाचे जगात स्वागत करताना आम्हाला किती आनंद होत आहे आमचा हा आनंद आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही”.