आपल्या देशातील नद्या जीवनरेखा म्हणून ओळखल्या जातात. त्याचबरोबर देशाची संस्कृती आणि सभ्यतेचा दर्पण म्हणूनही नद्यांकडे पाहिले जाते. भारतीय संस्कृती, समाज, राज्यकर्ते आणि संतांनी नद्यांना आईची उपमा दिली आहे. परंतु, वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि लोकसंख्येमुळे मोठ्या नद्यांमध्ये प्रदूषण वाढले आहे. याचमुळे जीवनदायिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नद्या आता दूषित होऊन मृत्यूचे कारण बनत आहेत. भारतात अनेक ठिकाणी नदीचा वापर धार्मिक कारणासाठी केला जाऊन त्यात हार-तुरे, निर्माल्य तसंच अनेक गोष्टी टाकल्या जातात. यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन त्याचा नागरीकांच्या आरोग्यावर परीणाम होतो आणि यावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने भाष्य केलं आहे. (Shashank Ketkar on River Pollution)
शशांक हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो नेहमीच त्याच्या राजकीय व सामाजिक भूमिका मांडत असतो. याआधी त्याने अनेकदा त्याच्या राजकीय व सामाजिक भूमिका सोशल मीडिया किंवा मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. अशातच त्याने आता नदीच्या वाढत्या प्रदूषणावरही त्याची भूमिका व्यक्त केली आहे. परदेशात नदीला नदीचं मानलं जातं. पण भारतात नदीला ‘माता’ म्हणूनही तिचे पावित्र्य राखलं जात नाही आणि यावर शशांकने मौन सोडलं आहे. “सण महत्त्वाचे. निसर्ग नाही” असं उपरोधिक भाष्यही त्याने या पोस्टमधून केलं आहे.

आणखी वाचा – तरुण वयातच नवऱ्याला गमावलं, ५४व्या वर्षीही एकटीच राहते सुप्रसिद्ध अभिनेत्री, आता जगत आहे असं आयुष्य
शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत भारतातील नदीबद्दल होणाऱ्या प्रदूषणावर भाष्य केलं आहे. शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये परदेशात नदीला नदी म्हणून बघतात, त्यामुळे ती स्वच्छ ठेवतात. असं म्हटलं असून नदीचे स्वच्छ रुप पाहायला मिळत आहे. पण भारतात नदीला माता म्हणत तिची पूजा केली जाते. मात्र निर्माल्य आणि इंटर कचरा नदीत टाकून टिचे पावित्र्य भंग केले जाते. याबद्दल भाष्य करण्यात आले आहे. यावर शशांकने असं म्हटलं आहे की, “आपण घाबरायची गरज नाही. देव येऊन स्वच्छ करतील”.
तसंच यापुढे शशांकने “सण महत्त्वाचे. निसर्ग नाही” असं उपरोधिक भाष्यही या पोस्टमधून केलं आहे. दरम्यान, शशांक केतकर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याआधी त्याने होणार सून मी या घरची व मन हे बावरे सारख्या लोकप्रिय मालिकांतही काम केले आहे. अभिनेता मालिकांमधील भूमिकांसाठी जितका चर्चेत राहत असतो. तितकाच तो सोशल मीडियावर आपली मतं व्यक्त करत चर्चेत राहत असतो.