काही दिवसांपूर्वी आलेली ‘स्क्विड गेम’ ही लोकप्रिय वेबसीरिज चांगलीच गाजली होती. ‘स्क्विड गेम’ या सीरिजची भारतासह जगभरात प्रचंड चर्चा झाली होती. ही सीरिज चांगलीच नावाजली गेली होती. तसेच यातील कलाकारदेखील विशेष चर्चेत आले होते. अशातच आता या सीरिजमधील एक अभिनेता एका कारणामुळे चर्चेत आला आहे. ‘स्क्विड गेम्स’मध्ये नंबर १ खेळाडूच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता ओह येओंग सूवर दक्षिण कोरियामध्ये लैंगिक शोषण प्रकरणात दोषी आढळला आहे.
काही वर्षांपूर्वी दक्षिण कोरियाच्या या अभिनेत्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता हे प्रकरण लक्षात घेऊन ‘स्क्विड गेम’ अभिनेत्याला आठ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे ओह येओंग सूचे नाव बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ‘स्क्विड गेम’ प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेता या प्रकरणामुळे चर्चेत होता. पण २०२१ मध्ये ओह येओंग सूविरुद्ध खटला दाखल करण्यात आला. मात्र, त्या अभिनेत्यावर कोणतीही कठोर कारवाई झाली नाही.
७९ वर्षीय अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर चौकशीही सुरु झाली. तथापि, अभिनेत्याने त्याच्यावरील आरोपांचे स्पष्टपणे खंडन केले होते. मात्र पुन्हा तपास सुरु झाल्यानंतर १५ मार्च २०२४ रोजी, सुवॉन जिल्हा न्यायालयाच्या सेओंगनाम शाखेने त्याला या प्रकरणात दोषी ठरवले. या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर अभिनेत्याला आठ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि दोन वर्षांसाठी निलंबितदेखील करण्यात आले आहे.
आणखी वाचा – मुनव्वर फारुकीबरोबरच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे एल्विश यादवने मागितली माफी, म्हणाला, “सनातन धर्मासाठी…”
दरम्यान, २०२१ मध्ये आलेल्या ‘स्क्विड गेम’ या वेब सीरिजमुळे अभिनेता ओह येओंग सू चांगलाच प्रसिद्धी झोतात आला. त्यात त्याचे नाव ओह इल होते. त्याचबरोबर त्यांना गोल्डन ग्लोब पुरस्कारही मिळाला होता.