बुधवार, सप्टेंबर 27, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Home - सासरच्या मंडळींबाबत पहिल्यांदाच खुलेपणाने बोलली स्पृहा जोशी, म्हणाली, “सासू-सासऱ्यांनी माझ्याकडून …”

सासरच्या मंडळींबाबत पहिल्यांदाच खुलेपणाने बोलली स्पृहा जोशी, म्हणाली, “सासू-सासऱ्यांनी माझ्याकडून …”

Sneha GaonkarbySneha Gaonkar
ऑगस्ट 7, 2023 | 11:33 am
in Trending
Reading Time: 3 mins read
Spruha Joshi On Family

Spruha Joshi On Family

मराठी सिनेमाविश्वातील सुसंस्कृत, सुजाण, सौम्य असलेल्या अभिनेत्रींनपैकी एक म्हणजे अभिनेत्री स्पृहा जोशी. स्पृहाने आजवर नाटक, मालिका आणि चित्रपट या तीनही माध्यमांमधून सिनेसृष्टीत उत्तम कामगिरी केली. स्पृहाचा विशेषतः कवितांकडे अधिक कल आहे, ती कविताप्रेमी आहे हे सर्वांनाच माहित आहे. स्पृहाचं तिच्या कुटुंबियांवरही विशेष प्रेम आहे. बरेचदा ती तिच्या कुटुंबाबद्दल बोलताना दिसते. अशातच अभिनेत्री स्पृहा जोशीने नुकतीच दिल के करीब या कार्यक्रमाला मुलाखती दिली तेव्हा तिने तिच्या सासरच्या कुटुंबाबद्दल विशेष भाष्य केलं. (Spruha Joshi On Family)

स्पृहाने सासरच्या कुटुंबाबद्दल भाष्य करताना म्हंटल की, “माझ्या करिअरला माझ्या आई-बाबांनी जितका पाठिंबा दिला तेवढाच किंबहुना त्याहून जास्त पाठिंबा माझ्या सासू-सासर्‍यांनी दिला आहे. माझं खरं काम माझ्या लग्नानंतर सुरू झालं. माझ्या सासूबाई अजूनही मी बाहेर जाताना माझा डबा भरून ठेवतात, मी काम करून आल्यावर मला ज्या पद्धतीचं आवडतं त्या पद्धतीचं जेवण घरी तयार असतं.”

पाहा सासरच्यांबद्दल काय म्हणाली स्पृहा जोशी (Spruha Joshi On Family)

पुढे ती म्हणाली, “एखाद्या फॅमिली फंक्शन असेल, कोणाचा साखरपुडा असेल, कोणाचं लग्न असेल, कोणी बोलावलं असेल या सगळ्या गोष्टी ओघाओघाने येतात जेव्हा आपण त्या प्रवासाला लागतो. पण त्यांनी माझ्याकडून ही कधी अपेक्षा केली नाही. त्यामुळे त्यांचं असं असणं ही माझ्यासाठी खूप सुंदर गोष्ट आहे. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते. आम्ही एकत्रच राहतो आणि असं आमचं चौघांचं छान कुटुंब आहे.

हे देखील वाचा – भारतीय जवानच आपला चाहता आहे कळल्यानंतर किरण माने भारावले, म्हणाले, “तो मला भेटायला आला आणि…”

View this post on Instagram

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

“माझे सासरे हे रिटायर्ड आहेत. पण घरी बसूनही ते बरच काम करतात. ते गीता पठण करतात आणि मोफत मुलांना त्याचं शिक्षणही देतात. तबला शिकवतात, शिवाय ते हार्मोनियम उत्तम वाजवतात. माझ्या सासूबाई कुशल होममेकर आहेत. आणि अत्यंत सुंदर स्वयंपाक करतात. माझ्या आईनंतर कोणी उत्तम स्वयंपाक करणारी माझ्या देखत असलेली व्यक्ती म्हणजे ती वरदची आई.”

हे देखील वाचा – “मासिक पाळी असताना देवळात जावसं वाटतं जा पण…” हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत, नेटकरी म्हणतात, “धर्माच्या बाबतीत…”

स्पृहाने तिच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी तिच्या सासू सासऱ्यांनी बरीच मदत केली. अभिनय क्षेत्र हे असे क्षेत्र आहे जिथे वेळ काळ विशेष पाळला जात नाही. अशावेळी जर घरच्यांचा सपोर्ट असेल तर आपण त्या क्षेत्रात नक्कीच पुढे जाऊ शकतो. स्पृहालाही सासरी आल्यानंतर या क्षेत्रात काम करण्यासाठी सपोर्ट मिळाला.

Tags: spruha joshispruha joshi on family

Latest Post

Tiger 3 Teaser Out
Bollywood Gossip

Tiger 3 Teaser : “जब तक टायगर मरा नहीं, तब तक टायगर हारा नहीं”, ‘टायगर ३’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्युज

सप्टेंबर 27, 2023 | 12:32 pm
Mrunmayi Deshpande entry in superhit hindi web series
OTT Special

मराठमोळ्या मृण्मयी देशपांडेची सुपरहिट हिंदी वेबसिरिजमध्ये एण्ट्री, अभिनेत्रीच्या हटके लूकने वेधलं लक्ष

सप्टेंबर 27, 2023 | 12:18 pm
Parineeti mangalsutra design similar with Priyanka’s mangalsutra
Bollywood Gossip

परिणीती चोप्राचं मंगळसूत्र तुम्ही पाहिलंत का?, बहिण प्रियांका चोप्राशी काय आहे कनेक्शन?, खास डिझाइनने वेधलं लक्ष

सप्टेंबर 27, 2023 | 12:01 pm
Gauri Kulkarni Clarification On Engagement
Television Tadka

‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीच्या ‘त्या’ फोटोमागील गुपित अखेर उलगडलं, पोस्ट शेअर करत म्हणाली, “साखरपुडा…”

सप्टेंबर 27, 2023 | 11:02 am
Next Post
The Elephant Whisperers controversy

ऑस्कर विजेत्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’मधील आदिवासी जोडप्याचे निर्मात्यांवर गंभीर आरोप, म्हणाले, “आमच्याकडे दुर्लक्ष केलं अन्…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist