सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भारतीय जवानच आपला चाहता आहे कळल्यानंतर किरण माने भारावले, म्हणाले, “तो मला भेटायला आला आणि…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 7, 2023 | 10:48 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
A Diehard fan came to meet Kiran Mane

भारतीय जवानच आपला चाहता आहे कळल्यानंतर किरण माने भारावले, म्हणाले, “तो मला भेटायला आला आणि...”

जेव्हा प्रेक्षक घरापासून कोसो दूर प्रवास करून आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी येतो, तेव्हा त्याला भेटण्याची इच्छा प्रत्येक कलाकाराच्या मनात असते. असाच एक अनुभव अभिनेते किरण माने यांनी प्रत्यक्ष अनुभवला आहे. अभिनेते किरण माने हे मालिका, चित्रपट व नाटकांमधून नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. ‘जाळ अन धूर संगटच’ असं म्हणत किरण माने हे आपल्या रांगड्या व गावरान अंदाजात पडद्यावर वावरत आलेले आहेत. त्यामुळेच ते आज चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनले आहेत. (Kiran Mane)

नेहमीच सोशल मीडियावर विविध विषयांवर सडेतोड मत मांडणारे अभिनेते किरण माने यांना भेटायला नुकतंच एक जबरा फॅन आला होता, जे भारतीय सैन्यात कार्यरत आहे. यावेळी जवान व त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीने किरण माने अतिशय भारावून गेले. आणि सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत त्यांनी या चाहत्याप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाले किरण माने ? (A Diehard fan came to meet Kiran Mane)

शेअर केलेल्या या फोटोमध्ये अभिनेता किरण माने यांच्यासोबत हा जबरा फॅन दिसत असून फोटोसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये अभिनेते म्हणतात, “काश्मीरजवळ बाॅर्डरवर आपल्या देशाच्या सुरक्षेत तैनात असलेला जवान आपला ‘डाय हार्ड फॅन’ असतो. ‘मुलगी झाली हो’ असो नायतर ‘बिग बाॅस’, त्यानं आपल्या कुठल्याच कार्यक्रमाचा एकही एपिसोड कधी चुकवलेला नाही. फेसबुकवरच्या आपल्या प्रत्येक पोस्टचीही तो तेवढ्याच उत्सुकतेने वाट पाहतो. वर्षभरानंतर सुट्टी मिळताच गांवाकडे येऊन पहिल्यांदा ‘किरण माने कुठे शुटिंग करताहेत?’ याचा शोध घेऊन आपल्याला भेटायला येतो. तेव्हा काळीज किती भरून येतं हे मी शब्दांत नाय सांगू शकत भावांनो !”

हे देखील वाचा – सचिन तेंडुलकरने व्हिडिओ कॉलद्वारे केलं दीपा परबचं कौतुक,पोस्ट शेअर करत दीपा म्हणाली “चित्रपटाने भरपूर काही दिलंय पण….”

“संग्राम शेटे हा जवान सहकुटूंब मला भेटायला आला. त्याच्यामुळे त्याचे कुटुंबीयही माझे फॅन झालेत ! त्याचा मुलगा तर जणू खूप जुनी ओळख असल्याप्रमाणे येऊन मांडीवर बसला. काय काय सांगू असं झालं होतं त्याला. बाबांनी येताना काय गिफ्टस् आणल्यात, तुम्ही बिगबाॅसमध्ये अमुक टास्क जिंकला तेव्हा आम्ही कसा जल्लोष केला. तेव्हा त्या तिघांच्याही चेहर्‍यावरचा ओसंडून वाहणारा आनंद पाहताना मी भारावून गेलो होतो.”, असं म्हणत किरण माने यांनी या चाहत्याप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (A Diehard fan came to meet Kiran Mane)

हे देखील वाचा – “तो बघ, जगातला सर्वात सुखी माणूस चाललाय…” ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याविषयी सचिन – सुप्रिया यांनी केलेलं वक्तव्य

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

‘मुलगी झाली हो’ मालिका व ‘बिग बॉस’ कार्यक्रमात झळकलेले अभिनेते किरण माने लवकरच ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेतून छोट्या पडद्यावर रिएन्ट्री करणार आहेत. ज्यात ते महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांना या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतुरलेले आहेत. (Kiran Mane)

Tags: big boss marathikiran manesindhutai mazi maisocial media
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Spruha Joshi On Family

सासरच्या मंडळींबाबत पहिल्यांदाच खुलेपणाने बोलली स्पृहा जोशी, म्हणाली, "सासू-सासऱ्यांनी माझ्याकडून …"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.