कलाकारांच्या खऱ्या आयुष्यतील जोडीदार, सेलिब्रिटी जोड्या, त्यांचे लग्नसमारंभ हा प्रेक्षकांच्या आवडीचा विषय आहे. नुकताच अभिनेता संकेत पाठक आणि अभिनेत्री सुपर्णा शाम या सेलिब्रटी जोडीचा विवाहसोहळा पार पाडला. त्यांच्या विवाह सोहळ्याचे अनेक फोटोज, व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Nivedita Saraf Sanket Suparna)
त्यांचे लग्नातले लूक्स, लग्नाची थीम, विवाह स्थळ हे सर्वच फार आकर्षक होते. पुण्यातील प्रतिशिर्डी येथील एका राजवाड्यात यांचा हा विवाह सोहळा संपन्न झाला. लग्नात संकेत आणि सुपर्णाचे अनेक लूक्स पहायला मिळाले.सुपर्णाचा हिरव्या रंगातील नवरीचा आणि संकेतचा लाल रंगाचं धोतर असा मराठमोळा लुक नंतर साऊथ इंडियन लुक ही त्यांनी केला होता. त्यांच्या संगीत फंक्शन साठी त्यांनी पांढऱ्या रंगाच्या कपड्यांनमध्ये ट्विनींग केले होते. त्यांचे हे सर्वच लुक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. पण या विवाहसोहळ्याला अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या उपस्थितीने चार चांद लावले असे म्हणता येईल.

पहा संकेत-सुपर्णाच्या लग्नातील निवेदिता यांचा खास क्षण (Nivedita Saraf Sanket Suparna)
संकेत आणि सुपर्णाच्या लग्नातला एक फोटो, निवेदिता सराफ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. हा माझ्यासाठी खरंच खूप भावनिक क्षण होता, माझे प्रिय, संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम विवाह बंधनात अडकले त्यांना खूप खूप आशीर्वाद. असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे.तसेच सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओज मध्ये निवेदिता अगदी वरमाई सारखी संकेतची काळजी घेताना पहायला मिळाल्या.त्यांच्या लग्नातील निवेदिता यांच्या सोबतचे क्षण ही सोशल मीडिया सध्या खूप चर्चेत आहेत.(Nivedita Saraf Sanket Suparna)

निवेदिता, संकेत आणि सुपर्णा यांनी स्टार प्रवाह वरील दुहेरी या मालिकेत एकत्र काम केले होते. यात निवेदिता यांनी संकेतच्या आईची भूमिका साकारली होती. निवेदिता कायमच त्यांच्या सहकलाकारांसोबत आपलेपणाने वागताना दिसतात. तर सध्या त्या कलर्स मराठी वरील भाग्य दिले तू मला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांच्या सहकालाकरांसोबत त्यांचं ऑफस्क्रीन ही खूप छान बॉण्डिंग पहायला मिळत. तर संकेत सध्या स्टार प्रवाह वरील लग्नाची बेडी या मालिकेत मुख्य नायक राघवच्या भूमिकेत पहायला मिळतो आहे.
हे देखील वाचा : “आम्ही दोघी जोडीच्या जोडीच्या”,निवेदिता सराफ यांच्या बहिणीला तुम्ही पाहिलंत का?