गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आणि अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. या सगळ्या चर्चांमध्ये हे दोघेही वेगवेगळे का होईना पण जाहीरपणे अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. नुकताच अभिनेता अभिषेक बच्चनने त्याच्या ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्यक्रमांना हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. अशातच अभिनेत्री ऐश्वर्या राय आता इव्हेंट्स आणि अवॉर्ड शोमध्येही दिसते. नुकतीच ती दुबईतील एका कार्यक्रमात दिसली असून, सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Aishwarya Rai Drops Bachchan Surname)
ऐश्वर्या रायच्या दुबई इव्हेंटमधील एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिच्या नावापुढे असलेले बच्चन आडनाव लावलेले दिसत नाहीये. हा व्हिडीओ समोर येताच ऐश्वर्या व अभिषेक बच्चन खरंच घटस्फोट घेणार आहेत की काय?, याविषयीच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. ग्लोबल वुमन फोरमच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ऐश्वर्या दुबईत आली होती. येथे त्यांनी महिला सक्षमीकरणासारख्या मुद्द्यांवर भाष्य केले. त्यामुळे या कार्यक्रमात काही व्यावसायिक कारणांमुळे अभिनेत्रीचे आडनाव न वापरता तिचे पहिले नाव वापरले गेले.
खरंतर, ऐश्वर्याने या पोस्टच्या एक दिवस आधी रात्री उशिरा मुलगी आराध्याच्या १३ व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले होते. १६ नोव्हेंबरला आराध्याचा वाढदिवस होता. बच्चन कुटुंबातील कोणीही तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले नव्हते. हे फोटो समोर आल्यानंतर ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी पुन्हा एकदा जोर धरला. त्यानंतर अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी लिहिले होते की, “मी कुटुंबाबद्दल बोलणे टाळतो, पण काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी या मुद्द्यांचा फायदा घेतात”.
अमिताभ यांनी या ब्लॉगवरील पोस्टमध्ये त्यांचा मुलगा अभिषेक आणि सुने ऐश्वर्या यांचा थेट उल्लेख केला नसला तरी त्यांच्या पोस्टला घटस्फोटाच्या मुद्द्याशी जोडले जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनेक रिपोर्ट्समध्ये अभिषेक व निमृत कौर यांच्यातील लिंकअपच्या बातम्यांचा उल्लेख होता. यावर अभिनेत्याच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, या सर्व गोष्टी केवळ अफवा आहेत.
आणखी वाचा – मेहंदी है रचनेवाली! रेश्मा शिंदेच्या हातावर रंगली मेहंदी, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल
तसंच अभिषेक बच्चनने नुकतेच एका मुलाखतीत ऐश्वर्या रायचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. तो म्हणाला की तो केवळ त्याच्या पत्नीमुळेच चित्रपट करु शकला. कारण ऐश्वर्या आपली मुलगी आराध्याची चांगली काळजी घेतली. घटस्फोटाच्या सततच्या बातम्यांवर अमिताभ बच्चनने जाणून घेतल्याशिवाय चुकीचे बोलू नका असं म्हणत थेट नाही, तरी सर्व काही ठीक असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले होते.