मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

साऊथ सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन यांच्या कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर, मोठी बहीण नागा सरोजा यांचं निधन

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 19, 2023 | 11:17 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nagarjuna Sister Passes Away

साऊथ सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन यांच्या कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर, मोठी बहीण नागा सरोजा यांचं निधन

Nagarjuna Sister Passes Away: साऊथ सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन यांच्या घरात दुःखाचं वातावरण पसरलं आहे. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते अक्किनेनी नागेश्वर राव यांची मुलगी आणि सुपरस्टार नागार्जुन यांची मोठी बहीण नागा सरोजा यांचे निधन झाले आहे. बऱ्याच दिवसांपासून त्या आजाराने त्रस्त असल्याचे सांगण्यात आलं. मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नागार्जुन यांची बहीण नागा सरोजा यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता. मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे अक्किनेनी यांच्या घरावर शोककळा पसरली आहे. बहिणीच्या मृत्यूनंतर नागार्जुन यांचे संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. नागा सरोजा या अभिनेता नागार्जुन यांची तिसरी मोठी बहीण होती. अक्किनेनी नागेश्वर राव यांना पाच मुले होती आणि नागा सरोजा ही त्यांची तिसरी मुलगी होती. अक्किनेनी नागेश्वर राव यांना तीन मुली आणि दोन मुलं असून सत्यवती, नागा सुशीला, नागा सरोजा, वेंकट आणि नागार्जुन अशी त्यांची नावं आहेत.

आणखी वाचा – राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यादरम्यान केलेल्या ‘त्या’ कृतीमुळे रणबीरची ऋषी कपूर यांच्याशी तुलना, नेमकं काय घडलं?

मंगळवारी सकाळी नागा सरोजा यांचा मृत्यू झाला असल्याची बातमी उशिरा उघडकीस आली. बहिणीच्या मृत्यूची बातमी कळताच चित्रपट व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती नागार्जुनला भेटायला येत आहेत. तसेच अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागा सरोजा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. बुधवारी नागा सरोजा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी वाचा – लग्नाच्या दोन वर्षांमध्येच घटस्फोट, नवऱ्यावर मारहाणीचा आरोप अन्…; आता मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखणंही झालंय कठीण, लूक बदलला आणि…

नागार्जुन यांच्या तीन पिढ्या चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. तेलगू चित्रपटसृष्टीत अक्किनेनी कुटुंबाचे वेगळे स्थान आहे. नागेश्वर राव यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा धाकटा मुलगा नागार्जुन याने पुढे चालू ठेवला आहे. कुटुंबातील बहुतांश सदस्य चित्रपटसृष्टीत असले तरी नागा सरोजा सुरुवातीपासूनच सिने विश्वापासून दूर राहिल्या. चित्रपटसृष्टी संदर्भातील कोणत्याच कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती लावली नाही. त्या फक्त कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावायच्या.

Tags: akkineni nagarjunaentertainmentnaga sarojanaga saroja passed awaynagarjunanagarjuna sister naga sarojaNagarjuna Sister Passes Awaysouth superstar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Shreya bugde share her experience related durga power

"एक शक्ती आहे जी…", परफॉर्म, चित्रीकरण करताना श्रेया बुगडेला जाणवते दैवी शक्ती, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, "दुर्गादेवीचा चेहरा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.