काही दिवसांपूर्वीच साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’चा दमदार टिझर पाहायला मिळाला. हा टिझर प्रदर्शित होताच लाखों वह्युज आले. या टिझरमध्ये अल्लू अर्जुन एका वेगळ्याच अवतारात पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबद्दल सर्वांमध्येच उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटाबद्दल अनेक अपडेट प्रेक्षकांच्या समोर येताना पाहायला मिळतात. अशातच आता ‘पुष्पा २’ या चित्रपटाच्या डिजिटल राईट्सबद्दल अपडेट समोर आली आहे. (pushpa 2 digital rights)
‘पुष्पा’ची पहिल्या भागाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. त्यातील पुष्पा व श्रीवल्लीची केमेस्ट्री, पुष्पाची मारामारी, त्याचा तोरा तसेच त्याच्या अभिनयाच्या अनेक पैलूमुळे हा चित्रपट अतिशय हिट झाला.पाहिल्या भागानंतर या चित्रपटाचा दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. आता ही प्रतिक्षा संपली असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मिळालेल्या माहिती नुसार ‘पुष्पा २’ च्या निर्मात्यांनी खूप पैसे खर्च केले आहेत. या चित्रपटाचे बजेट एसएस राजामौलीच्या चित्रपटाइतके झाले आहे. या चित्रपटातील फक्त सहा मिनिटांचा एक सीन शूट करण्यासाठी निर्मात्यांनी तब्बल ६० कोटी रुपये खर्च केले आहेत. हा सीन टिझरमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. आता या चित्रपटाचे डिजिटल राईट्सदेखील खरेदी करण्यात आले आहेत.
‘बॉलिवूड लाईफ’च्या वृत्तानुसार ‘पुष्पा २’चे डिजिटल राईट्स नेटफ्लिक्सने १०० कोटी रुपयांना खरेदी केले गेले आहेत. याबरोबरच सालारचे डिजिटल राईट्स १६२ कोटी व आरआरआरचे डिजिटल राईट्स ३५० कोटी रुपयांना खरेदी केले होते. तसेच ‘पुष्पा २’चे ग्लोबल म्युजिक राईट्स व हिंदी सॅटेलाट्स राईट्स टी-सिरिजने ६० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहेत.
आतापर्यंत या चित्रपटासाठी ५०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या चित्रपटाचा टिझर अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशीच प्रदर्शित करुन त्याच्या चाहत्यांना खास भेट दिली आहे. अल्लू अर्जुनचे ‘पुष्पा २’चे पोस्टर रिलीज करण्यात आले असून त्यामध्ये तो शंकराच्या अवतारात दिसत आहे.