गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सेन्सॉर बोर्डाने लाखो रुपयांची लाच घेतल्याचा सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा आरोप, एकनाथ शिंदेंना आवाहन करत म्हणाला…

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 29, 2023 | 12:09 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Vishal talks on corruption

सेन्सॉर बोर्डाने लाखो रुपयांची लाच घेतल्याचा सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा आरोप, एकनाथ शिंदेंना आवाहन करत म्हणाला...

दाक्षिणात्य अभिनेता विशालने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलसं केलं. अ‍ॅक्शन चित्रपटांमध्ये त्याने केलेलं काम विशेष गाजलं.  आता विशाल एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनवर (CBFC) लाच घेतल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियाद्वारे एक व्हिडीओ शेअर करत त्याने संपूर्ण प्रकाराबाबत भाष्य केलं. ‘मार्क अँटनी’ या चित्रपटात विशाल शेवटचा दिसला. या चित्रपटाच्या हिंदी भागासाठी त्याला लाखो रुपये लाच द्यावी लागली असल्याचं विशालचं म्हणणं आहे.

विशालने शेअर केलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या. ‘मार्क अँटनी’ चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यासाठी त्याला सेन्सॉर बोर्डाच्या एका अधिकाऱ्याला ६.५ लाख रुपये द्यावे लागले असल्याचं त्याने सांगितलं. कोणत्याही परिस्थितीमध्ये विशालला हिंदीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करायचा होता. म्हणून त्याने ही रक्कम देऊ केली. मात्र चित्रपटसृष्टीमध्ये सुरु असलेला हा भ्रष्टाचार त्याला सहन झाला नाही.

आणखी वाचा – Video : गणपतीसाठी कोकणातील गावी गेलेल्या अविनाश नारकरांचा ‘पप्पांनी गणपती आणला’ गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “ऐश्वर्या मॅडम…”

विशालने व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “भ्रष्टाचार रुपेरी पडद्यावर दाखवणं सोपं आहे. पण खऱ्या आयुष्यात भ्रष्टाचार होतो हे खूप चुकीचं आहे. सरकारी ऑफिसमध्ये तसेच मुंबईमधील सीबीएफसी कार्यालयामध्ये अशाप्रकारची गोष्ट घडणं चुकीचं आहे. म्हणूनच हा भ्रष्टाचाराचा मुद्दा मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आणून द्यायचा आहे”.

आणखी वाचा – अक्षरा-अधिपतीच्या लग्नात भूवनेश्वरीचा थाट

#Corruption being shown on silver screen is fine. But not in real life. Cant digest. Especially in govt offices. And even worse happening in #CBFC Mumbai office. Had to pay 6.5 lacs for my film #MarkAntonyHindi version. 2 transactions. 3 Lakhs for screening and 3.5 Lakhs for… pic.twitter.com/3pc2RzKF6l

— Vishal (@VishalKOfficial) September 28, 2023

पुढे विशाल म्हणाला, “माझ्या मेहनतीची रक्कम भ्रष्टाचारामध्ये गेली आहे. म्हणूनच मी तुमच्याकडून आशा करत आहे की, नेहमीप्रमाणे सत्याच विजय होईल”. विशालला हे संपूर्ण सत्य जगासमोर आणायचं होतं. आता एकनाथ शिंदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केल्यानंतर या संपूर्ण प्रकारावर पुढे कोणता निर्णय घेतला जाणार हे पाहावं लागेल.

Tags: bollywood actorbollywood movieentertainment
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Anil Sharma On Priyanka Chopra

"ती व तिची आई माझ्याजवळ रडत होत्या आणि…", 'गदर'च्या दिग्दर्शकाचा प्रियांका चोप्राबाबत मोठा खुलासा, "नाकाची सर्जरी झाली अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.