शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचा मोठा निर्णय, स्वतःच्या नावापुढे लावणार बायकोचंही नाव, म्हणाला, “माझी ओळख…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 17, 2024 | 9:37 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
south actress varlakshmi sarathkumar husband

लग्नानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचा मोठा निर्णय, स्वतःच्या नावापुढे लावणार बायकोचंही नाव, म्हणाला, "माझी ओळख..."

दाक्षिणात्य अभिनेत्री वरलक्ष्मी सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती तिच्या लग्नामुळे खूप चर्चेत आली होती.  ३ जुलै २०२४ रोजी तिने तिचा बॉयफ्रेंड निकोलाई सचदेवबरोबर लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर तिने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. थायलँडमध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केले. मात्र आता लग्नानंतर काही दिवसांतच तिचा नवरा निकोलाईने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. लग्नानंतर काही दिवसांत दोघांनीही पत्रकारपरिषद घेतली. यामध्ये त्यांनी एक घोषणा केली आहे. (south actress varlakshmi sarathkumar husband)

वरलक्ष्मी व निकोलाई यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दोघांनी आपला परिचाय करुन दिला. यावेळी निकोलाईने तमिळ न बोलता आल्यामुळे माफीदेखील मागितली. त्यावेळी तो म्हणाला की, “वरलक्ष्मी लग्नानंतर तिचे नाव बदलू इच्छित आहे. नक्कीच तिला सारथकुमार हे आडनाव लावणं सोडणार नाही. मात्र तिला सचदेवहे आडनावही लावायचं आहे. पण मी असं होऊ देणार नाही”.

आणखी वाचा – कुटुंबासह चाळीमध्येच राहायचे लक्ष्मीकांत बेर्डे, लेक अजूनही विसरला नाही ‘ते’ दिवस, म्हणाला, “पप्पांना पाहण्यासाठी गर्दी…”

View this post on Instagram

A post shared by Varalaxmi Sarathkumar (@varusarathkumar)

पुढे ती  म्हणाली की, “ती नेहमी असेल आणि तिचे नाव वरलक्ष्मी सारथकुमारच राहील. मी तिचे नाव लावेन. मी माझं नाव निकोलाई वरलक्ष्मी सरथकुमार सचदेव असं ठेवेन आणि हीच माझी ओळख असेल. त्याचप्रमाणे माझी मुलगीदेखील हेच नाव लावेल. मी माझ्या पत्नीसाठी हे करायला तयार आहे. मी व माझी मुलगी हा वारसा पुढे नेऊ”.

आणखी वाचा- मुकेश अंबानींनी दिवसाला तीन कोटी खर्च केले तर त्यांची संपत्ती कधीपर्यंत संपणार?, तज्ज्ञांची माहिती ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का कारण…

पुढे तो म्हणाला की, “लग्नानंतरही ती तिचे काम सुरु ठेवेल. मी वरलक्ष्मीला खूप वर्षांपासून ओळखतो. माझे लग्न तिच्याबरोबर झाले असले तरीही मी तिचे पहिले प्रेम नाही. चित्रपटच तिचं पहिलं प्रेम आहे आणि ओळखही. मी दुसऱ्या क्रमांकावर येतो. त्यामुळे ती तिचे काम सुरुच ठेवेल. कामांमध्ये ती कोणताही ब्रेक घेणार नाही”.दरम्यान निकोलाई घटस्फोटीत असल्याने त्याच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने वरलक्ष्मीवर मोठ्या प्रमाणात टिका झाली होती. मात्र तिने सगळ्याकडे दुर्लक्ष करत निकोलाईबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Tags: nicolai sachdevsoucth actressvarlakshmi sarathkumar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Home Minister fame Aadesh Bandekar shared a special video of the darshan of Dnyaneshwar and Tukaram Maharaj know more

Video : हेचि दान देगा देवा! विठ्ठल भक्तीत रमले आदेश बांदेकर, अन्नदानही केलं अन्…; साधेपणाचं होतंय कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.