उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने शुक्रवारी १२ जुलै रोजी राधिका मर्चंटशी लग्नगाठ बांधली. गेल्या काही महिन्यांपासून हा लग्नसोहळा चर्चेत आहे. भव्यदिव्य प्री-वेडिंग कार्यक्रमांनंतर अत्यंत शाही अंदाजात अनंत-राधिका विवाहबंधनात अडकले. या लग्नसोहळ्यात देश-विदेशातील मान्यवर उपस्थित होते. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या ग्लॅमरस अंदाजात अंबानींच्या कार्यक्रमांना पोहोचले होते. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या लग्नाचेच फोटो आणि व्हिडीओ पहायला मिळत आहेत. त्यामुळे सर्वच माध्यमांमध्ये या शाही लग्नाची आणि लग्नात झालेल्या खर्चाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.
मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याच्या श्रीमंती आणि वैभवामुळे तो अनेकदा चर्चेत राहत असतात. रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्याकडे एकूण १०.२१ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. तुम्हाला माहिती आहे का की, जर मुकेश अंबानींनी दररोज ३ कोटी रुपये खर्च केले किंवा त्यांनी दानही केले तर त्यांची सर्व संपत्ती किती वर्षात संपेल? जर मुकेश अंबानींनी त्यांच्या एकूण संपत्तीपैकी दररोज ३ कोटी रुपये खर्च केले किंवा दान केले तर त्यांची सर्व संपत्ती ३,४०,३७९ दिवसांत संपेल. वर्षात ३६५ दिवस असतात. ३,४०,३७९ दिवसांचे वर्षांमध्ये रूपांतर केल्यास, त्याची सर्व संपत्ती नष्ट होण्यास ९३२ वर्षे ६ महिने लागतील.
याचाच अर्थ, मुकेश अंबानी यांनी त्यांच्या एकूण संपत्तीपैकी दररोज ३ कोटी रुपये खर्च केले किंवा दान केले तर त्यांची सर्व संपत्ती संपायला अनेक शतके जातील. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, २०२४ मध्ये अंबानींच्या संपत्तीत आतापर्यंत सुमारे १.९८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या दहा दिवसांत अंबानींची संपत्ती ३ अब्ज डॉलर्सने वाढली आहे. गेल्या २४ दिवसांत मुकेश अंबानी यांनी १०९ मिलियन डॉलर्स म्हणजेच ९०१० कोटी कमावले आहेत.
आणखी वाचा – “आईचं निधन झालं आणि…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, म्हणाला, “मी गावी गेलो अन्…”
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअमरन मुकेश अंबानी आहेत. त्यांचे मुंबईतील घर अँटिलिया हे जगातील सर्वात महागडे खाजगी घर आहे. सध्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी अनंत अन् राधिका यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. अनंत अंबानी यांचा विवाह राधिका मर्चंटसोबत 12 जुलै रोजी मुंबईत झाला. हे लग्न भारतातील सर्वात मोठ्या आणि मोठ्या थाटामाटात साजरे झालेल्या लग्नांपैकी एक होते. त्यात देश-विदेशातील अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला.