दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. २०१५ साली ‘प्रेमम’ या मल्याळी चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर ती ‘फिदा’, ‘काली’, ‘मारी २’, ‘अथिरन’ या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या सर्वच भूमिकांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. आता ती रणबीर कपूरबरोबर ‘रामायण’ या चित्रपटांमध्ये सीता मातेची भूमिका करताना दिसणार आहे. आतापर्यंतच्या तिच्या भूमिकांसाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. अभिनयाबरोबरच सर्वत्र तिच्या खासगी आयुष्याबद्दलही मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते. आशातच आता तिच्या अफेअरबद्दल चर्चा सुरु आहेत. (sai pallavi affair)
सध्या मनोरंजन क्षेत्रात एका लग्न झालेल्या अभिनेत्याबरोबर अफेअर असण्याच्या चर्चा सुरु आहेत. ‘सिनेजोश’च्या एका अहवालानुसार, अभिनेत्री तिच्यापेक्षा वयाने असणाऱ्या अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या अभिनेत्याला दोन मुलंदेखील असल्याचे समोर आले आहे. हा अभिनेता म्हणजे नक्की कोण? यांचा खुलासा अद्याप तरी झाला नाही.
याआधीही साई पल्लवीच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. तिने वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्यांना डेट केल्याच्या चर्चाही मोठ्या प्रमाणात रंगल्या. मात्र तिच्या चाहत्यांनी तिची बाजू घेत असे काही नसल्याचेही सांगितले. तसेच अभिनेत्रीच्या टीमनेही या सर्व प्रकरणावर कोणतेही भाष्य केले नाही. याबरोबरच तिच्याबद्दलचे अनेक व्हिडीओदेखील समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये पडद्यावर काम करताना मेकअप न लावता तिची मूळ स्कीन दाखवण्यास सुरुवात केल्याचे सांगितले गेले होते. त्यामुळे न्यूड मेकअप करणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख निर्माण झाली.
यावेळी अभिनेत्रीला एक प्रश्न विचारला की, “तू इतर अभिनेत्रीपेक्षा वेगळी काशी आहेस?”, त्यावर तिने उत्तर दिले की, “मला नाही माहीत. मला जर कोणी माझ्या मेकअपबद्दल विचारले तर काय सांगावे हे समजत नाही. मी एक सामान्य मुलगी आहे. माझ्या चेहऱ्यावर मुरुमं आहेत. पण माझी कला ही महत्त्वाची आहे”. सध्या साई पल्लवीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ‘रामायण’चित्रपटामधुमन ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटासाठी तिने फी तीनपट वाढवल्याचे सांगितले गेले आहे. म्हणजे तिची फी वाढून आता १८ ते २० कोटी रुपये असू शकते असा अंदाज बांधला जात आहे.