टेलिव्हीजनवरील अनेक अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमी चर्चैत येताना दिसतात. मालिकांमध्ये किंवा इतर कार्यक्रमांमध्ये काम करताना अभिनेत्रींना अनेक समस्यांचा सामनादेखिल करावा लागतो. काही अभिनेत्रींना तर कास्टिंग काऊचादेखील सामना करावा लागला आहे. याबद्दल त्या आता व्यक्त होताना दिसतात. तसेच यामुळे त्यांच्या खासगी आयुष्यावरही खोलवर परिणाम झाला आहे. एक अभिनेत्री म्हणून कलाकारांना स्वतःकडे लक्ष देणेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. मात्र त्यांना बॉडी शेमिंगचाही सामना करावा लागतो. तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अभिनेत्रींना ट्रोलदेखील केले जाते. या अभिनेत्री नक्की कोण आहेत? कोणत्या अभिनेत्रींना बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला? याबद्दल आपण आता जाणून घेऊया. (actress body shaming)
टेलिव्हीजनवरील प्रसिद्ध मालिका ‘नागिन’ या मालिकेतून सगळ्यांच्या समोर आलेली शायंतनी घोष ही अभिनेत्री नेहमी चर्चेत राहिली आहे. ‘कुमकुम-एक प्यारा सा बंधन’, ‘घर एक सपना’, ‘सबकी लाडली बेबो’, ‘गीत हुई सबसे पराई’ अशा अनेक मालिकांमधून शायंतनीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. एका मुलाखतीमध्ये तिने खुलासा केला की, “माझ्या स्तनांवरुन मला खूप ट्रोल केले गेले. खूप विचित्र प्रतिक्रियादेखील नेटकरी देत असत”. हे सगळं तिच्यासाठी खूप त्रासदायक होते असेही तिने सांगितले.
शमा सिकंदर ही हिंदी चित्रपट व टेलिव्हीजन क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. शमाने अनेक मालिका, चित्रपट व कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचेदेखील अनेक चाहते आहेत. मात्र मनोरंजन क्षेत्रांमध्ये तिला अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र तिने उत्तर देत ट्रोलर्सचे तोंडही बंद केले आहे. तिने सोशल मीडियावर ट्रोलर्सना उत्तर देत लिहिले की, “महिलांना शरीराबद्दल बोलणं बंद करा”.
त्याचप्रमाणे ‘बढो बहू’ या मालिकेतून सगळ्यांच्या समोर आलेली अभिनेत्री म्हणजे रितीशा राठोड. तिने तिच्या अभिनयाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. सोशल मीडियावरही रितिशा खूप सक्रिय असते. तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. मात्र तिला अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. याकडे ती पूर्णपणे दुर्लक्ष करते. बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्तालादेखील अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र ती ट्रोलर्सना सडेतोड उत्तरदेखील देते.