शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या दोन महिन्यांमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री गरोदर, बेबी बम्प दाखवत फोटो केला शेअर, म्हणाली, “आता आम्ही…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 4, 2024 | 1:31 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
south actress amala paul and jagat desai announced her pregnancy with flaunting her baby bump photos on social media

लग्नाच्या दोन महिन्यांमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री गरोदर, बेबी बम्प दाखवत फोटो केला शेअर, म्हणाली, “आता आम्ही…”

प्रसिद्ध दक्षिण अभिनेत्री अमाला पॉलने नुकतेच प्रियकर जगत देसाईबरोबर लग्न केले होते. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच आमलाने ती गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिच्या प्रेग्नेंसीबद्दलची माहिती दिली आहे. अमलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पती जगतबरोबरचे काही हटके फोटो पोस्ट करून तिच्या गरोदरपणाबद्दल सांगितले आहे. (Amala Paul On Instagram) 

या फोटोमध्ये आमलाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर जगतने काळ्या रंगाचा शर्ट व त्यावर पॅंट परिधान केली आहे. दोघांनी बीचवर खास पोज देत एकमेकांबरोबरचे रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत. दुसऱ्या एका फोटोमध्ये अमला तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, “आता मला माहित आहे की १+१ हे तुझ्याबरोबर ३ आहे.” या फोटोखाली अनेक कलाकार मंडळींनी व चाहत्यांनी कमेंट करत अमाला व जगतला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amala Paul (@amalapaul)

आणखी वाचा – दिग्पाल लांजेकरांच्या ‘शिवरायांचा छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित, ‘हा’ अभिनेता साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका

अमला-जगतचे ५ नोव्हेंबर २०२३ रोजी कोचीमध्ये लग्न पार पडले होते. तिच्या लग्नात अमालाने लॅव्हेंडर रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर जगतनेही अमालाच्या लूकला साजेसा अशी शेरवानी परिधान होती. अमालाचे हे दुसरे लग्न असून तिचा पहिला संसार अवघ्या तीन वर्षातच मोडला होता. अमालाने दिग्दर्शक एल. एल. विजयबरोबर पहिलं लग्न केलं होतं. २०१७ मध्ये अमालाने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीबरोबर घटस्फोट घेतला. त्यानंतर तिची मैत्री जगतबरोबर झाली. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा – “ते दिवस नरकासारखे…”, सोनम कपूरच्या नवऱ्याला झाला होता गंभीर आजार, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “तीन महिने माझ्यासाठी…”

अमालाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने प्रामुख्याने हिंदी, तमिळ व  मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. मामूटीचा ख्रिस्तोफर हा तिचा नुकताच प्रदर्शित झाला होता. अमालाने अजय देवगणच्या ‘भोला’मध्येही छोटीशी भूमिका साकारली होती. दरम्यान, अमालाने शेअर केलेल्या या फोटोखाली अनेक् कलाकारांसह तिच्या अनेक चाहत्यांनीही तिला कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेकांनी तिला अभिनंदनही केले आहे.

Tags: amala paulentertainmententertainment newssouth actress
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Nupur Shikhare and Ira Khan Wedding Marathi News

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : आमिर खानच्या लेकीच्या लग्नात अंबानी कुटुंबियांची हजेरी, गाडीमधून उतरताच अभिनेत्यासह पूर्वाश्रमीच्या पत्नीचीही गळाभेट घेतली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.