प्रत्येक कलाकार हा चाहत्याच्या अगदी जवळचा असतो. चाहते कलाकारांवर जितके प्रेम करतात, तितकेच प्रेम देखील ते त्यांच्या चाहत्यांवर करतात. पण जेव्हा एखादा चाहत्याच्या घरावर संकट कोसळतं, तेव्हा कलाकार त्यांना धीर देण्यासाठी नेहमीच पुढे येतात. त्यामुळेच लोक कलाकारांवर प्रचंड प्रेम करतात. दाक्षिणात्य अभिनेता सूर्या त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत येतोच. पण तो आता एका कारणाने चर्चेत आलेला आहे. (Suriya visits his fans house who died in road accident)
काही दिवसांपूर्वी सूर्याच्या एका चाहत्याचा रस्ते अपघातात निधन झालं होतं. त्याच्या निधनाची बातमी कळताच सूर्या त्या चाहत्याच्या घरी पोहोचला. यावेळी त्याने चाहत्याला श्रद्धांजली वाहत त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. अभिनेत्याचा हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.
हे देखील पाहा – “मी तुमची पूर्वीपासूनच…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्नीने सुकन्या मोनेंचं केलं तोंडभरुन कौतुक, अभिनेत्रीचा घरी बोलावून केला पाहुणचार
सूर्याच्या एका फॅन पेजने हे फोटोज त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोजमध्ये अभिनेता त्या चाहत्याच्या फोटोला हात जोडताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत तो चाहत्यांच्या कुटुंबियांशी बोलताना दिसत आहे. या फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी यावर लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रेम दर्शवलं आहे.
'@Suriya_offl visited Aravind's house and offered prayers and condolences to the family for the loss.
— Suriya Fans Club (@SuriyaFansClub) September 28, 2023
Aravind, member of Suriya Fans Club lost his life in a road accident. pic.twitter.com/oQI4cBPNVX
हे देखील पाहा – ‘हॅरी पॉटर’मधील ‘मिस्टर डंबलडोअर’ यांचे वयाच्या ८२व्या वर्षी निधन, मायकेल गॅम्बॉन अनेक दिवसांपासून होते आजारी
अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या कमल हसनच्या ‘विक्रम’ चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती. त्याच्या लूकचे विशेष कौतुक झाले होते. सध्या तो शिवा दिग्दर्शित ‘कंगुवा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून त्याच्यासह बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी झळकणार आहे. त्याचबरोबर तो ‘वाणांगण’ चित्रपटातही दिसणार आहे.