मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी तुमची पूर्वीपासूनच…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्नीने सुकन्या मोनेंचं केलं तोंडभरुन कौतुक, अभिनेत्रीचा घरी बोलावून केला पाहुणचार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 28, 2023 | 8:27 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sukanya Mone On CM Eknath Shinde

"मी तुमची पूर्वीपासूनच…", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्नीने सुकन्या मोनेंचं केलं तोंडभरुन कौतुक, अभिनेत्रीचा घरी बोलावून केला पाहुणचार

सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळतेय. गणेशोत्सवानिमित्त बऱ्याच कलाकार मंडळींनी बाप्पाची मनोभावे पूजा केली आहे. कलाकार मंडळीही गणरायाचं दर्शन घेण्यात व्यस्त आहेत. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन झालं होतं. बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला हजेरी लावली होती. अनेक कलाकारांनी मुख्यमंत्र्याच्या वरील बाप्पाचे फोटोस सोशल मीडियावरून शेअर देखील केले होते. (Sukanya Mone On CM Eknath Shinde)

यंदा मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यावर दहा दिवसांसाठी बाप्पाचं आगमन झालं होतं. कलाकार मंडळी तसेच अनेक नेते मंडळींनीही वर्षा बंगल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणरायाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्र्यांकडून बॉलिवूड तसेच मराठी कलाकार मंडळींना बाप्पाच्या दर्शनाचं रीतसर आमंत्रण देण्यात आलं होतं. मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी मुख्यमंत्र्यांच्या घरी दर्शन घेतलं. अशातच अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही मुख्यमंत्र्यांच्या घरून आलेल्या आमंत्रणाचा मान राखून बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी वर्षा बंगल्यावर आलेला पाहुणचाराचा अनुभव त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले मराठी कलाकार, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Sukanya Kulkarni Mone (@sukanyamoneofficial)

सुकन्या मोने यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “मा.मुख्यमंत्री. श्री.एकनाथराव शिंदे. यावर्षी आपल्या श्री गणपती दर्शनाला मला आवर्जून निमंत्रित केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपण आणि आपल्या कुटुंबाने आम्हा सगळ्या कलाकार मंडळींकडे जातीने लक्ष दिलेत त्याबद्दल आभार. आपल्या सौ. नी त्या माझ्या पूर्वीपासून fan आहेत हे सांगून मला सुखावले. पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार! गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!”.

आणखी वाचा – Video : “तेरा मुझसे है पेहले का नाता कोई…”, सिद्धार्थ जाधवच्या लेकीचा गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला, “हा दिवस…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी मराठी कलाकारांना आमंत्रित केलं होतं. दरम्यान काल संपूर्ण मराठी सिनेसृष्टीने मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ बंगला उजळून निघाला होता. मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. शिवाय अभिनेता मंगेश देसाई, स्वप्नील जोशी, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, सुशांत शेलार, अक्षय वाघमारे, हार्दिक जोशी, अक्षया देवधर, मृण्मयी देशपांडे, हेमांगी कवी, सुप्रिया पाठारे, सुकन्या कुलकर्णी यांसारख्या अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली.

Tags: cm eknath shindeeknath shindeentertainmentsukanya mone
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Avinash Narkar On Ganeshotsav and Konkan

Video : गणपतीसाठी कोकणातील गावी गेलेल्या अविनाश नारकरांचा 'पप्पांनी गणपती आणला' गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, "ऐश्वर्या मॅडम…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.