बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अवघ्या तिशीत सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मित्राच्या मेहंदीमध्ये नाचला, मित्रांसह मस्करी केली अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 12, 2025 | 4:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rakesh Poojary Death

अवघ्या तिशीत सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मित्राच्या मेहंदीमध्ये नाचला, मित्रांसह मस्करी केली अन्...

Rakesh Poojary Death : हसत-खेळत असलेल्या व्यक्तीचं क्षणात निधन होणं याबाबत अनेक घटना कानावर येतात. आता अशीच एक दुःखद बातमी समोर आली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध कलाकार राकेश पुजारीचं रविवारी (११ मे) निधन झालं आहे. तो ३४ वर्षांचा होता. राकेशच्या अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. एका कार्यक्रमात गेला असता त्याला अचानक त्रास होऊ लागला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जागीच राकेशचं निधन झालं. त्याच्या जाण्यानंतर संपूर्ण कुटुंबियांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Rakesh Poojary Death)

पीटीआयच्या वृत्तानुसार, राकेश उडुपी जिल्ह्यामधील करकला येथील एका गावी मेहंदी कार्यक्रमासाठी गेला होता. कार्यक्रमामध्ये तो उपस्थित राहिला. तोपर्यंत सगळं काही ठिक होतं. शिवाय कोणतीच शारीरिक समस्या त्याला जाणवली नाही. मात्र कार्यक्रम सुरु झाल्यानंतर राकेशला त्रास होऊ लागला. कार्यक्रमातच त्याला हृदयविकाराचा झटका झाला. काही कळायच्या आतच राकेशने शेवटचा श्वास घेतला.

आणखी वाचा – भारत-पाकिस्तान तणावात अमृतसरमध्ये भारती सिंहचं कुटुंब, स्वतः थायलंडला जाताच ट्रोल, खूप रडली अन्…

View this post on Instagram

A post shared by Rakesh Poojary (@rakeshpoojary_comedy_kiladi)

या मेहंदी कार्यक्रमातील राकेशचे काही शेवटचे फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये तो मित्र-मंडळींसह विविध पोज देत फोटो काढताना दिसत आहे. त्याचे हे फोटो निधनाआधीच्या काही तासांपूर्वीचेच आहेत. ते पाहून अनेकांना मोठा धक्का बसला. राकेशच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना हळहळ व्यक्त केली आहे. तसेच चाहत्यांनीही सोशल मीडियाद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा – “एका मूर्ख स्त्रीसाठी तो…”, घटस्फोटाच्या चर्चांवर गोविंदाच्या पत्नीचं मोठं भाष्य, ३८ वर्षांचा संसार मोडणार का?

राकेशचा जवळचा मित्र व अभिनेता शिवराज केआर पीटने म्हटलं की, “त्याला शारिरीक कोणतीच समस्या नव्हती. तो त्याच्या गावी गेला. तिथे एका मित्राच्या लग्नाच्या कार्यक्रमात उपस्थित होता. तिथे त्याने डान्सही केला”. राकेशचा बीपी कमी झाला आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. ‘कॉमेडी खिलाडीलु सीझन ३’ शोचं विजेतेपद राकेशने पटकावलं. या शोनंतर त्याचं आयुष्यच बदललं. कन्नड तसेच तेलुगू चित्रपटांमध्ये काम करत त्याने कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. पेटकम्मी, अम्मेर पोलिस, पम्मना द ग्रेट, उमिल, इलोकेल सारख्या चित्रपटांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका विशेष उल्लेखणीय ठरल्या.

Tags: entertainment newssouth actorsouth actor death
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Martyr Surendra Moga Daughter

वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, "बदला घेईन"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.