दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य सध्या त्याच्या ‘थांडेल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘थांडेल’ हा चित्रपट नागा चैतन्यच्या कारकिर्दीतील एक मोठा चित्रपट ठरु शकतो आणि तो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अभिनेता त्याच्या अभिनयासाठी जितका लोकप्रिय आहे. तितकाच तो त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. अशातच त्याने नुकताच स्वत:चा फिटनेस फंडा शेअर केला आहे. अभिनेत्याने स्वत:च्या फिटनेसबद्दल बोलताना साखरेविषयी भाष्य केलं आहे आणि त्याने साखरेला दारु व तंबाखू पेक्षा हानिकारक म्हटलं आहे. अभिनेता त्याच्या ‘थांडेल’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान व्यस्त असून या प्रमोशनदरम्यान त्याने हे भाष्य केलं आहे. (Naga Chaitanya called sugar is harmful)
‘रॉ टॉक्स विथ व्हीके पॉडकास्ट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नागा चैतन्य म्हणाला की, “साखर हे तुमच्या शरीरासाठी सर्वात मोठे विष आहे. दारू चांगली, तंबाखू चांगली, काहीही चांगले. पण साखर नाही. माझा असा विश्वास आहे की, साखरेमुळे आपल्याला कर्करोग, मधुमेह आणि इतर अनेक समस्या उद्भवतात ज्या जीवघेण्या आहेत. तर, मी खूप जागरूक आहे. मी खूप कमी साखर खातो”.
या वक्तव्यानंतर नागा चैतन्यने म्हटलं की, “कृपया आता माझं हे वाक्य लगेचच व्हायरल करू नका. म्हणजे यावर आता लगेच रील करू नका. मला वाटतं की, साखर खाल्ल्यानं मधुमेह, कॅन्सरसारखे आजार होतात. असे अनेक पदार्थ असतात जे आपल्यासाठी, शरिरासाठी घातक असतात. म्हणून मी फार साखर खात नाही. कधी तरी चीट डे असेल तरच मी गोड खातो”.
या मुलाखतीत त्याने स्वत:च्या वैवाहिक नात्याबद्दलही भाष्य केलं. अभिनेत्याने सांगितले की आम्हाला आमच्या पद्धतीने पुढे जायचे होते आणि आमच्या स्वतःच्या कारणांसाठी दोघांनी मिळून हा निर्णय घेतला. आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात पुढे जात आहोत. आम्ही गोपनीयतेची मागणी केली होती. प्रेक्षक आणि माध्यमे त्याचा आदर करतील अशी मला आशा होती, पण तसे झाले नाही”.