Sonnalli Seygall Announces Pregnancy : काल स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत टेलिव्हिजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री गोपी बहू म्हणजेच देबोलिना भट्टाचार्जीने नुकतीच आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली. देबोलिनानंतर आता ‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्री सोनाली सहगलनेही लवकरच आई होणार असल्याची घोषणा केली आहे. अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना एका खास पद्धतीने सांगितली आहे. लग्नाच्या एका वर्षानंतर अभिनेत्रीने गरोदरपणाची घोषणा केली आहे. ही बातमी समजल्यानंतर सेलिब्रिटी व चाहते सोनालीचे अभिनंदन करत आहेत.
सोनाली सहगलने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत आई होणार असल्याची आनंदाची बातमी दिली. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने तीन फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा बेबी बंप दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये काहीतरी खाताना दिसत आहे आणि तिच्या शेजारी तिचा नवरा त्याच्या तोंडात बिअरची बाटली आणि हातात बाळाच्या दुधाची बाटली धरुन बसलेला दिसत आहे. अभिनेत्रीच्या समोर बेडवर चिप्स, कुकीज व पुस्तके ठेवलेली आहेत.
गरोदरपणाची घोषणा करताना सोनालीने कॅप्शन देत असे म्हटले आहे की, “बिअरच्या बाटल्यांपासून बाळाच्या बाटल्यांपर्यंत आशिषचे आयुष्य बदलणार आहे. जोपर्यंत माझा संबंध आहे, काही गोष्टी तशाच राहतात. पूर्वी मी एकटीसाठी खात होतो, आता मी दोघांसाठी खात आहे. दरम्यान, समशेर (सोनालीचा कुत्रा) चांगला मोठा भाऊ होण्यासाठी नोट्स काढत आहे. धन्य आहे आणि खूप आनंद झाला. कृपया प्रार्थना करा”. अभिनेत्रीने असेही सांगितले की, ती येत्या डिसेंबरमध्ये आई होईल.
सोनाली सहगल ७ जून २०२३ रोजी आशिष सजनानीसह लग्न केले. सोनाली व आशिष जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. सोनालीने २०११ मध्ये ‘प्यार का पंचनामा’ मधून बॉलिवूड विश्वात पदार्पण केले. हा चित्रपट लव रंजन यांनी दिग्दर्शित केला होता. यानंतर सोनाली ‘प्यार का पंचनामा २’ मध्येही दिसली होती. अभिनेत्रीने ‘वेडिंग पुलाव’. सोनू के टिटू की स्विटी’, ‘बुंदी रायता’, ‘नुरानी चेहरा’, यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.