Bigg Boss Marathi 5 update : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांमध्ये राडे होताना पाहायला मिळत आहेत. स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक स्पर्धक उत्तम खेळ खेळताना दिसत आहे. सध्या ‘बिग बॉस’च्या घरात तिसऱ्या आठवड्यात कॅप्टन्सीसाठी राडा सुरु असलेला दिसला. यंदाच्या सीजनमधील तिसऱ्या आठवड्याचा कॅप्टन नेमका कोण होणार यासाठी स्पर्धकांना एक नवा टास्क देण्यात आला आहे. समोर आलेल्या टास्कमध्ये असं पाहायला मिळत आहे की, सर्व स्पर्धकांचे दोन गट करण्यात आले आहेत आणि दोन्ही गटांना जास्तीत जास्त मोती संदुकीमधून गोळा करुन ते गार्डन एरियामधील बोटीमध्ये लोड करायचे आहेत. हा खेळ सुरु असताना सगळे स्पर्धक आपापल्या परीने मोती गोळा करायचे प्रयत्न करतात.
नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये ‘बिग बॉस’ने दोन गट पाडले होते. यामध्ये टीम ए मधल्या वैभवला टीम बी मध्ये जायला सांगितले होते आणि टीम बी मधील सूरजला टीम ए मध्ये जायला सांगितले होते. दोन्ही टीम आपापल्या परीने खेळत असताना ब्रेकमध्ये वैभवने जाऊन अरबासह संपर्क साधला आणि हे साऱ्यांनाच खटकलं. तर सूरज दुसऱ्या टीमसाठीही उत्तम खेळ खेळताना दिसला. टीम ए च्या म्हणण्यानुसार टीम बी आता वैभवलाच नॉमिनेट करणार असं वाटत असताना टीम बी ने वैभवला सेफ करत माणुसकी दाखवली त्यामुळे सर्वत्र त्यांचं कौतुकही झालं.
मात्र, या खेळादरम्यान वैभव उत्तम खेळ खेळला नसल्याचे पाहायला मिळालं. दुसऱ्या टीमसाठी खेळत असताना वैभवने त्यांना दगा दिल्याचं दिसलं. एपिसोडमध्ये असं पाहायला मिळालं की, वैभव, अरबाज व जान्हवीसमोर मान्य करतो की, त्याने चिटिंग केली. त्याने पिशव्यांमध्ये कमी मोती भरले आणि जास्त मोती अरबाजच्या ताब्यात दिले. त्यावेळी अरबाजही म्हणतो की, मी हात दुखावल्याचे नाटक करतो. त्यांनतर अरबाज व जान्हवी मिळून निक्कीबद्दल चुगलीही करताना दिसले.
या सर्व प्रकरणावर आता ‘बिग बॉस’ फेम लावणीक्वीन सुरेखा कुडची यांनी केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. “वैरी. आज बॉलचा टास्क झाल्यानंतर वैभव बाथरुम एरियामध्ये सांगत होता की त्याने पिशव्या व बॉल दिले. शिवाय मुद्दाम पिशवीत कमी बॉल भरले. क्या बात है वैभव ज्या टीमबरोबर होतास त्यांनाच दगा दिलास. बाकी आज ‘बिग बॉस’ने सगळ्यांशी साधलेला संवाद मस्त होता. मज्जा आली. मालवणी पण भारी होती”, असं म्हणत त्यांनी वैभवला टोला लगावला.