Tejaswini Pandit Presence In Navaratri Festival : लोअर परळ येथे शेलार मामा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सवाला यंदा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात सुरुवात झाली. या धार्मिक सोहळ्याने परिसरात एक आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले, भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नवचंडी याग-यज्ञ सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पारंपरिक विधी, वेद मंत्रोच्चार आणि धार्मिक शिस्तीमध्ये पार पडलेल्या या यज्ञामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. या पवित्र सोहळ्यात अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी उपस्थित राहून देवीची मनोभावे पूजा केली. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला एक वेगळेच आकर्षण लाभले.
आणखी वाचा – आधी गाडी डिव्हायडरवर चढली आणि नंतर…; ३० वर्षीय अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, कुटुंबावर कोसळला दुःखचा डोंगर

या नवरात्रोत्सवात अनेक भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. देवीचे दर्शन, यज्ञात सहभाग आणि सामूहिक प्रार्थना यांमुळे श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. यावेळी बोलताना तेजस्विनी पंडित म्हणाल्या, “नवरात्रोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अशा पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणे माझ्यासाठी आनंददायी आणि समाधानकारक आहे.” एकंदरीत, भक्तिभाव, परंपरा आणि सामूहिक श्रद्धेचा अनुभव देणारा हा नवरात्रोत्सव भाविकांसाठी स्मरणीय ठरत आहे.
आणखी वाचा – ‘सालबर्डी’मधील ‘मंजुळा’ गाण्यात सोनाली कुलकर्णीचा हटके अंदाज; ‘अप्सरा’ बनली ‘मंजुळा’





