सोशल मीडिया इन्फ्लुएंसर उर्फी जावेद ही नेहमी चर्चेत असते. तिच्या अतरंगी ड्रेसिंगमुळे सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर उर्फी जावेद ही नेहमी चर्चेत असते. याआधी उर्फीने हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. मात्र तिला अभिनेत्री म्हणून कधीही ओळख मिळाली नाही. तिच्या अतरंगी कपड्यांवरुन तिला अनेकदा ट्रोलदेखील केले. मात्र तिने कधीही या सगळ्या ट्रॉलिंगकडे लक्ष दिले नाही. सोशल मीडियावर उर्फीचे अनेक फॉलोअर्स आहेत. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण कोणत्याही अतरंगी कंपड्यांमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे तिच्याबद्दल बोलले जात आहे. सोशल मीडियावर उर्फी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. नक्की काय आहे? ते आपण जाणून घेऊया. (urfi javed social media post)
उर्फी तिच्या सोशल मीडिया पोस्टवरुन अनेकदा चर्चेत येत असते. नुकतीच उर्फीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने गाऊन विकण्यासंदर्भात सांगितले आहे. मात्र तिने गाऊनची किंमतदेखील सांगितली ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. उर्फीने शनिवारी इन्स्टाग्राम हँडलवर एक काळ्या रंगाचा फोटो शेअर केला आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, “मी माझा फुलपाखरं असलेला ड्रेस विकण्याचा विचार केला आहे. हा ड्रेस सगळ्यांच्याच पसंतीस पडला होता. किंमत ३,६६,९०,००० रुपये मात्र. ज्यांना हा ड्रेस खरेदी करायचा आहे त्यांनी मला DM करा”.
उर्फीने पोस्ट शेअर केल्यानंतर किंमत ऐकून सगळे जण हैराण झाले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी प्रतिक्रियादेण्यासही सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “फक्त ५० रुपये कमी पडले नाहीतर घेतला असता”. दुसऱ्या एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली की, “इएमआयवर मिळेल का? मी मोतीचूरचे लाडूचे व्याज देऊ शकतो”, तसेच तिसऱ्या एकाने लिहिले की, “हा डायमंड ड्रेस आहे का की जो ३ कोटी रुपयांना विकला जात आहे?”, उर्फीची बहीण डॉलीनेदेखील लिहिले की, “मी हा खरेदी केला असता पण माझ्याकडे एक डॉलर कमी आहे”.
दरम्यान उर्फीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, उर्फीची प्राइम व्हिडीओ सीरिज ‘फॉलो कर लो यार’ प्रेक्षकांच्या भेटीस आली होती तसेच तिच्या कपड्यांमुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असलेली दिसून येते. तिचे इन्स्टाग्रामवर ५.२ मिलियन फॉलोअर्स आहेत.