सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर उर्फी जावेद ही नेहमी चर्चेत असते. तिच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलमुळे नेहमीच तिच्याबद्दल चर्चा होताना दिसते. तिने हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. मात्र तिला अभिनेत्री म्हणून कधीही ओळख मिळाली नाही. तिच्या अतरंगी कपड्यांवरुन तिला अनेकदा ट्रोलदेखील केले. मात्र तिने कधीही या सगळ्या ट्रॉलिंगकडे लक्ष दिले नाही. सोशल मीडियावर उर्फीचे अनेक फॉलोअर्स आहेत. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण कोणत्याही अतरंगी कंपड्यांमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे तिच्याबद्दल बोलले जात आहे. (uorfi javed viral post)
उर्फी सध्या तिच्या ‘फॉलो कर लो यार’ या वेबसीरिजमुळे अधिक चर्चेत आहे. ही सीरिज तिच्या जीवनावर आधारित आहे. सोशल मीडियावर याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झाली. अशातच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये तिने तिच्याबरोबर घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “काल माझ्याबरोबर आणि माझ्या कुटुंबाबरोबर खूप चुकीचं घडलं. फोटोग्राफर्स माझे फोटो काढत होते. त्यावेळी माझ्या बाजूने काही मुलं गेली. त्यातील एकाने मला विचारले की, “व्हॉट इज युअर बॉडी काऊंट?’त्या मुलाचे वय फक्त १५ वर्ष होते. त्याने माझ्या कुटुंबासमोर आणि माझ्या आईसमोर असे केले”.

अभिनेत्रीने अजून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “मी किती त्रासलेली आहे ते हे तुम्ही माझा चेहरा बघून कळत असेलच. त्या मुलांना सगळ्यांच्या समोर कानाखाली मारावी असं मला वाटत होतं. कृपया तुमच्या मुलांना महिलांचा आदर करायला शिकवा.

पुढे तिने लिहिले की, “या मुलांच्या आई-वडिलांसाठी खूप वाईट वाटत आहे”. दरम्यान उर्फीचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.दरम्यान उर्फी तिच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. तसेच तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात.