प्रसिद्ध, लोकप्रिय विनोदवीर सुनील पाल बेपत्ता असल्याची माहिती समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला. कामासाठी गेलेले सुनील कुठे आहेत?, कसे आहेत? याबद्दल कोणालाच काहीच कल्पना नव्हती. शिवाय त्यांचा फोनदेखील बंद असल्याने कुटुंबियांची चिंता आणखी वाढली. सुनील यांच्याबरोबर काहीही संपर्क होऊ शकत नसल्यामुळे त्यांची पत्नी सरिता पाल यांनी सांताक्रुझ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. अखेर पोलिसांनी सुनील यांचा शोध लावला. अशातच आता सुनील पाल यांनी अपहरणाबाबत आणखी एक खुलासा केला आहे. (sunil pal kidnapping news)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील पाल यांच्याकडून खंडणी घेतल्यानंतर अपहरणकर्त्यांनी मेरठमधून लाखोंचे दागिने विकत घेतले. मेरठ शहराचे एस.पी. आयुष विक्रम यांनी नुकतीच ही माहिती दिली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी दोन ज्वेलर्सची खाती गोठवल्याचेही म्हटलं जात आहे. मेरठ शहराचे एसपी आयुष विक्रम यांनी नुकतीच या प्रकरणी नवी माहिती दिली आहे. याबद्दल त्यांनी असं सांगितलं की, “काही दिवसांपूर्वी ज्वेलर्सनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, मुंबई पोलिसांनी त्यांची खाती गोठवली आहेत. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी मुंबई पोलिसांशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितले की, ऑनलाईन फसवणुकीमुळे ही खाती गोठवली गेली आहेत.
आणखी वाचा – “मला तिच्या रुपात मुलगीच झाली अन्…”, मृणाल कुलकर्णींनी सांगितलं सूनेबरोबरचं नातं, म्हणाल्या, “देवाने थेट…”
सध्या हा फ्रीज काढून टाकण्यात आला आहे. मात्र यामध्ये वापरलेले पैसे लिंकवर ठेवण्यात आले आहेत. याबाबत अद्याप चौकशी सुरु आहे”. ज्वेलर्सनी ही रक्कम ६ लाख रुपये असल्याचे सांगितले आहे. हे खाते काही फसवणुकीशी निगडीत असल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे खाती गोठवण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील पालचे अपहरण केल्यानंतर त्यांना मेरठमध्ये सोडण्यात आले होते. खंडणी गोळा केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी तेथील एका ज्वेलरी दुकानातून काही दागिनेही खरेदी केले.
आणखी वाचा – बजरंगच्या मदतीने अक्षरा समोर आणणार सासूचं सत्य, भुवनेश्वरीचा पर्दाफाश होणार?, अधिपती कुणाची बाजू घेणार?
या दागिन्यांचे आर्थिक व्यवहार सुनील पाल यांच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणाचा तपास सुरू केला. याशिवाय पोलीस ज्वेलरी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरऱ्यांचीही पाहणी करत आहेत. त्यामुळे आता यामध्ये पुढे काय चौकशीमध्ये काय माहिती मिळणार हे पोलिसांच्या मदतीने समोर येईल