सध्या ‘बिग बॉस’फेम मुनव्वर फारुकी खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी कोकणी लोकांसंबंधी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात टिकेचा सामना करावा लागला होता. घडलेल्या सर्व प्रकरणानंतर त्याने सोशल मीडियाच्या मध्यमातून चाहत्यांची माफी देखील मागितली. मात्र आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. देशभरामध्ये सध्या कोलकातामधील बलात्कार व हत्येसंदर्भात संताप व्यक्त केला जात आहे. प्रत्येक जण आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी यासाठी मागणी करत आहेत. अशातच आता मुनव्वरनेदेखील या प्रकरणावर भाष्य केले आहे. (munawar faruqui viral video)
कोलकतामध्ये बलात्काराच्या घटणेनंतर बॉलिवूडकरांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे. तसेच मुनव्वरने एक कविता सोशल मीडियावर पोस्ट केली ज्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे. त्याने एक भावनिक कविता केली असून भारताला स्वातंत्र्य मिळाले तरीही महिला मात्र अजूनही असुरक्षित आहेत असे त्याने कवितेमध्ये म्हटले आहे. त्याने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “खूप शुभेच्छा, मुलगी झाली आहे. आपण सध्या जे सोशल पाहत आहोत. जो रिपोर्ट आला आहे. विचार करा जर रिपोर्टच आला नसता तर? आपण तंत्रज्ञानामध्ये इतके पुढे गेलो आहोत पण कुठे राहिलोय आपण? धर्मावरुन एकदुसऱ्यांबरोबर भांडण्यामधून वेळ मिळाला असता तर कदाचित ७८ वर्षानंतर ही अवस्था नसती”.
तसेच त्याने कवितेत म्हंटले आहे की, “ती अनेक परीक्षा देते. घाणेरड्या नजरांना सामोरी जाते, ती जळत आहे यासगळ्यामध्ये, ती दुकांनांमधून घाबरून घरी आली आहे. कोणी म्हणतं ती घरची लक्ष्मी आहे. कोणी म्हणतं भरभराट झाली आहे. कोणी म्हणतं ती ओझं आहे. शुभेच्छा, घरी मुलगी आली आहे. रात्र होती, कपडे असे घातले होते, एकटी होती, हे कसले तर्क आहेत. तो जनावर त्याला कपडे व वयातील काय फरक समजणार? ज्या मुलीला आई-वडिलांनी फुलांसारखं जपलं ती मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे. खूप शुभेच्छा घरी मुलगी जन्माला आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा”.
मुनव्वरच्या या कवितेला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. महिलांची समाजात काय अवस्था आहे? तिला कीटि असुरक्षित वाटतं याबद्दल त्याने कवितेतून सोप्या शब्दांत सांगितले आहे.