सध्या भारतात सर्वत्र कोलकत्ता येथील शिकाऊ डॉक्टरवर झालेल्या बलात्कार व हत्येसंदर्भात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. सर्वच स्तरातून या विषयावर संतापजनक प्रतिक्रियादेखील उमटत आहेत. पीडितेला न्याय मिळावा यासाठी आता संपूर्ण बॉलिवूड एकवटले असून नराधमांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीदेखील करत आहेत. यामध्ये आता अभिनेत्री जिनिलिया देशमुख व रिमि सेन यांनी आरोपींना फाशी व्हावी अशी मागणी न्यायव्यवस्थेकडे केली आहे. त्याच प्रमाणे आलिया भट्ट, करीना कपूर, हृतिक रोशन,विजय वर्मा, सुहाना खान, आयुष्यमान खुराना यांच्या सहित अनेक बॉलिवूड कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. (bollywood actors on kolkata rape case)
आतापर्यंत या घटनेतील ९ आरोपींची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे. आता पोलिस अजून आरोपींच्या शोधात असून लवकरच पकडले जातील असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान संपूर्ण देशभरात याबद्दल संताप व्यक्त केला जात असून सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात येत आहे. आशाच आता कलाकारांनी सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहेत. जिनिलियाने पोस्ट शेअर करत लिहिले की, “त्या राक्षसांना फाशी झाली पाहिजे. तिला जो त्रास झाला ते ऐकून माझ्या अंगावर काटा आला. कामावर असताना डॉक्टरला एका भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागला. मी पीडितेच्या कुटुंबाबरोबर आहे. मी विचारदेखील नाही करु शकत की ते या परिस्थितीचा सामना कसे करत असतील माझ्यासाठी स्वातंत्र्य तेव्हाच असेल जेव्हा देशातील प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटेल”.
Monsters need to be hanged!!!
— Genelia Deshmukh (@geneliad) August 15, 2024
Just reading what #Moumita_Debnath went through sent chills up my spine. A woman, a lifesaver who was on duty faced this horror in the seminar hall. My heart goes out to the family and her loved ones – can’t even imagine how they are facing this… pic.twitter.com/DW0wVGrw26
या प्रकरणावर रिमि सेननेदेखील मत व्यक्त केले आहे. ‘हिंदूस्तान टाइम्स’बरोबर बोलताना सांगितले की, “मला असं वाटतं की आरोपीना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी. कठोर कायद्यापेक्षाही कठोर शिक्षा व्हावी. असे काही करण्याआधी कोणीही घाबरलं पाहिजे अशी शिक्षा देण्यात यावी”.
पुढे ती म्हणाली की, “भारतात दुबईसारखी पद्धत सुरु करायला हवी. आपल्याकडे कठोर कायदे व शिक्षा मात्र कमी दिली जाते. याचे कारण म्हणजे देशात ओळखी व राजकारण्यांचे वर्चस्व असल्याने कोणत्याही गुन्ह्यातून बाहेर पडणे सहज शक्य होते. आपण कितीही या घटनांचा विरोध केला तरीही काही बदलणार नाही”.
याबरोबरच ट्विंकल खन्नानेदेखील या प्रकरणावर संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट करत लिहिले की, “या जगात येऊन मला ५० वर्ष झाली. मी माझ्या मुलीला तेच शिकवते जे मी माझ्या लहानपणी शिकले आहे. बागेत, शाळेत, बीचवर असं बाहेर एकटं जाऊ नकोस. तसेच कोणत्याही अनोळखी पुरुषाबरोबर, काकांबरोबर, भावाबरोबर एकटं जाऊ नकोस. एकटं जाऊ नकोस, संध्याकाळी, रात्री आणि रात्रीदेखील, कारण तू एकटी गेलीस तर कदाचित तू परत घरी येऊ शकणार नाहीस”.
त्याच प्रमाणे, करीना कपूरनेदेखील बलात्कार प्रकणावर भाष्य करत लिहिले की, “१२ वर्षानंतरही तीच गोष्ट, तेच आंदोलन, पण आपण मात्र अजून बदल होण्याची वाट बघत आहोत”.
दरम्यान आता आरोपींना शिक्षा होणार का? तसेच याबद्दल कोणता निर्णय घेतला जाणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.