स्नेहल शिदम ही “चला हवा येउद्या” होऊ दे वायरल या पर्वाची विजेती ठरली होती. स्नेहल ही “चला हवा येउद्या” या विनोदी रियालिटी कार्यक्रमातून नावारूपाला आली कारण विजेते पद जिंकल्यानंतर स्नेहल शिदम हिने याच कार्यक्रमात पुढे काम केले. तिने तिच्या विनोदी अभिनयाने अखंड महाराष्ट्राला खळखळून हसवलं. काही दिवसांपूर्वी विनोदी अभिनेत्री वनिता खरात हिचे लग्न पार पडले असून तिच्या लग्नात स्नेहल आणि विनोदी अभिनेता निखिल बने यांनी एकत्र फोटो काढून तो स्नेहलने सोशल मीडियावर शेअर केला होता. (snehal shidam nikhil bane)
या फोटोला तिने “पिरतीच्या फडात गं…धरला हात असा…काळीज येंधलं आरल …” असं कॅप्शन दिलं होतं. त्यानंतर हा फोटो पाहून सोशल मीडियावर स्नेहल आणि निखिल यांच्या अफेरची चर्चा रंगली होती. या फोटोवर इट्स मज्जा ला दिलेल्या इंटरव्युव्ह मध्ये निखिल बने यानी स्पष्टीकरण दिले होते निखिल नंतर या फोटोवर अखेर स्नेहल ने ही मौन सोडलं असून यावर भाष्य केले आहे.
स्नेहाने दिलं स्पष्टीकरण (snehal shidam nikhil bane)
स्नेहल म्हणाली, “लोकांना फार क्रेझ असते की सेलिब्रिटींच्या आयुष्यात नक्की काय चाललंय ते जाणून घेण्याची. आतापर्यंत अनुष्का शर्मा काय करते, काय घालते, कशी राहते याबद्दल लोकांची क्रेझ मी पाहिली होती. पण तो फोटो व्हायरल झाल्यानंतर तीच क्रेझ आमच्याबद्दल आहे हे बघून भारी वाटलं. खरं तर मी आणि निखिल खूप सॉर्टेड आहोत. आमचं अफेयर नाही आणि चांगले मित्र आहोत.” असं स्नेहलने सांगितलं.
फोटो व्हायरल झाल्यावर त्याच्या बातम्या आल्या, त्यानंतर खूप लोकांचे फोन आल्याचं स्नेहलने सांगितलं. “दोन-तीन दिवस आम्हाला खूप लोक फोन करत होते, आम्हाला सांगितलं का नाही, असं विचारत होते. पण नंतर निखिलची प्रतिक्रिया आणि त्याने सर्व गोष्टी स्पष्ट केल्या, त्यानंतर सगळं थांबलं,” असं स्नेहल हसत म्हणाली.

स्नेहल आता टॉप ची विनोदी अभिनेत्री आहे पण ज्यावेळी ती स्ट्रगल करत होती त्यावेळेस तिला ऑडिशनला गेल्यावर तिच्या रंगावरून आणि जाडपणामुळे रिजेक्ट केलं जायचं पण जेव्हा तिने “चला हवा येउद्या” होउदे वायरल या पर्वा चं ऑडिशन दिलं तेव्हा ती त्यात सिलेक्ट झाली शिवाय तिने तिच्या विनोदी अभिनयाने हा कार्यक्रम जिंकला सुद्धा.
====
हे देखील वाचा – भाग्य दिले तू मला मालिकेत नवीन वळण प्रेक्षकांचं आवडतं पात्र घेणार मालिकेतून निरोप?
====
“चला हवा येउ द्या” शिवाय स्नेहलने ‘माझा होशील ना’ आणि ‘भागो मोहन प्यारे’ या दोन्ही मालिकेत काम केले आहे.