बिग बॉस फेम स्नेहा वाघ नेहमीच सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. बिग बॉस मुळे स्नेहाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात तिने सहभाग घेतला होता. दरम्यान बिग बॉसच्या घरात येण्याआधी आणि येण्यानंतरही ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. अवघ्या वयाच्या १३व्या वर्षांपासून स्नेहाने अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.(sneha wagh)
स्नेहा नेहमीच तिचे नवनवीन फोटो शेअर करून चाहत्यांच्या पसंतीस पडते. स्नेहाने नुकताच तिने डेटवर गेला असल्याचा फोटो शेअर केला आहे. आणि तिच्या या फोटोंची चर्चा सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. या फोटोत ती निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देत स्नेहाने एक पोस्ट शेअर केलीय आणि म्हटलंय, “मी सध्या व्यस्त आहे. कारण मी डेटवर आली आहे. ते देखील स्वत: बरोबर. सध्या शांती आणि आनंदाच्या शोधात आहे.”
पहा स्नेहा वाघ कुठे गेलीय डेटवर (sneha wagh)

तिने या पोस्टला mountains, blessed , holiday असे हॅशटॅग वापरून पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या फोटोमध्ये ती फिरायला गेलेल्या ठिकाणी म्हणजे उटीला चांगलीच रमलेली दिसत आहे. स्नेहाच्या या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तर स्नेहाच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत फार छान, मस्त, खूप सुंदर असे म्हणत तिच्या फोटोना लाईक केले आहे.
‘अधुरी एक कहानी’, ‘काटा रुते कुणाला’ या मालिकेत तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. त्यानंतर स्नेहाने ‘ज्योती’, ‘ढोलकीच्या तालावर’, ‘चंद्रशेखर’, ‘मेरे साई’ या मालिकांमध्ये काम केलं. छोट्या पडद्यावर स्नेहाने केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. यांनतर तिने बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.(sneha wagh)
====
हे देखील वाचा – हे देखील वाचा – “भर उन्हात तो थांबला,आणि..” आकाशचा असा ही एक चाहता
====
स्नेहा तिच्या अभिनय क्षेत्रातील घडामोडींपेक्षा वैवाहिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. कमी वयात म्हणजे वयाच्या १९व्या वर्षी स्नेहाने आविष्कार दार्वेकर सोबत लगीनगाठ बांधली. मात्र काही वर्षातच ते विभक्त झाले. घरगुती हिंसाचाराचा आरोप करत स्नेहाने आविष्कारला दोषी ठरवले. त्यानंतर ७ वर्षांनी स्नेहाने इंटेरियर डिझायन असलेल्या अनुराग सोलंकीसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. मात्र काही महिन्यातच ते दोघेही विभक्त झाले.
