माजी अभिनेत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अलीकडेच एका कार्यक्रमातील खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्या जॅकी श्रॉफ व जेडी मजेठिया यांच्यासह संवाद साधताना दिसल्या. ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ फेम या अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्वतःचे व जॅकीचे एकत्र संवाद साधतानाचे फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये दोघेही एकमेकांसह चर्चा करताना दिसत आहेत. (Smriti Irani Diet Advice)
स्मृती इराणी यांनी शेअर केलेल्या फोटोंच्या खालील मजेशीर कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी स्मृती यांनी काळ्या व सोनेरी रंगाची प्रिंटेड साडी परिधान केली आहे, तर जॅकीने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. याशिवाय त्यांनी निर्माते जेडी मजेठिया यांच्याबरोबरचाही एक फोटो शेअर केला आहे.
या शेअर केलेल्या फोटोंखाली स्मृती इराणी यांनी हटके कॅप्शन देत म्हटलं आहे की, “दोन प्रकारचा आहार सल्ला, खूप मेहनत पण चमत्कार नाही. भिडू, वजन कमी करा, तंदुरुस्त राहा, चरबी वाढवू नका, अंडी, वांगी खा, ब्रेड खाऊ नकोस. बहिणी, वजन कमी कर. डाएट कर कोणालाच कळणार नाही” असं त्यांनी म्हटलं आहे.
स्मृती या अभिनेत्यासह गप्पा मारताना दिसत आहे. या पोस्ट्सवर कमेंट करत चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्मृती यांचं कॅप्शन पाहून, “तुमची विनोदबुद्धी अप्रतिम आहे, तुम्ही खूप छान दिसत आहात स्मृती मॅडम, तुम्ही खूप सुंदर स्त्री आहात” असं म्हटलं आहे. तर एका चाहत्याने “डाएटबद्दल कोणाला माहित पडणार नाही?”अशा कमेंट केल्या आहेत. स्मृती इराणी या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांचे अपडेट्स त्या चाहत्यांसह शेअर करत असतात.