मराठी टीव्हीविश्वातील सध्याचा मोस्ट हँडसम हिरो म्हणजे अभिनेता मंदार जाधव. स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत जयदीपच्या भूमिकेत दिसणारा मंदार त्याच्या हँडसम लूकिंगसोबत दमदार अभिनयासाठीसुद्धा ओळखला जातो. याची झलक मालिकेत आपल्याला अनेकदा पाहायला मिळाली. मालिकेसोबत मंदारचं एक विशेष नातं असून त्याच्या भूमिकेवर चाहते भरभरून प्रेम करतात. (smnka mandar jadhav)
अभिनेता मंदार जाधव ऑनस्क्रीन जितका प्रेमळ आणि काळजीपूर्वक वावरतो, तितकाच तो रिअल लाईफमध्येही वावरतो. मंदार मितिका शर्माशी २०१६ मध्ये विवाहबद्ध झाला असून या जोडीला ह्रीदान आणि रेहान अशी दोन मुलं आहेत. मंदार फॅमिलीसोबतचे अनेक फोटोज व रील्स सोशल मीडियावर नेहमी पोस्ट करतो. असाच एक रील मंदारने आपल्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर पोस्ट केला, ज्यात तो त्याच्या मुलांसोबत बीचवर मस्ती करताना दिसतोय.
पहा मंदार जाधवचा मुलांसोबतचा हा धम्माल रील (mandar jadhav latest reel)
मंदारने पोस्ट केलेल्या या रीलमध्ये तो आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवत असून मंदार-मितिका आणि त्यांची दोन्ही मुलं एका बीचवर किल्ले बनवताना दिसतात. या रीलला मंदारने ‘Beach Day ????️’ असं सुंदर कॅप्शन दिलं आहे. पहा मंदार व त्याच्या फॅमिलीचा हा सुंदर रील… (mandar jadhav latest reel)
अभिनेता मंदार जाधवची पत्नी मितिका हीसुद्धा टीव्ही अभिनेत्री असून तिने आजवर अनेक हिंदी मालिका केल्यात. ‘देवोंके देव महादेव..’, ‘ख्वाहिश’, ‘संतान’ अशा हिंदी मालिकांमध्ये काम करणारी मितिका सध्या छोट्या पडद्यापासून लांब असली तरी ती सोशल मीडियावर फारच ऍक्टिव्ह असून अनेकदा ती इन्स्टाग्रामवर तिचे सुंदर फोटो शेअर करते. काही महिन्यांपूर्वी मितिका स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात मंदारसोबत दिसली होती, त्यावेळेस या दोघांचा ग्लॅमर्स अंदाज पाहायला मिळाला होता.
हे देखील वाचा : “चोरी चोरी छुपके छुपके” प्रसाद-अमृताने थेट जाहीर केली लग्नाची तारीख