शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हा सरस्वती आणि कलेचा अपमान”, मुख्यमंत्र्यांनी शो मध्येच सोडून जाण्यावर भडकला सुप्रसिद्ध गायक, म्हणाला, “आदर करत नसाल तर…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 10, 2024 | 7:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Singer Sonu Nigam expressed his displeasure on the Chief Minister left the cultural program organized in Rajasthan show

मुख्यमंत्र्यांनी शो मध्येच सोडून जाण्यावर भडकला सुप्रसिद्ध गायक, म्हणाला, “हा सरस्वती आणि कलेचा अपमान”

कोणत्याही कलाकारासाठी तो ज्याच्यासमोर आपली कला सादर करत आहे, तो त्याच्यात रमून जाणे ही सन्मानाची बाब असते. बॉलिवूडमधील अशा अनेक लोकप्रिय गायकांना लाईव्ह ऐकण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. अशा काही लोकप्रिय गायकांपैकी एक गायक म्हणजे सोनू निगम. आपल्या सुरेल आवाजाने लोकांची मने जिंकणाऱ्या सोनू निगमने अलीकडेच राजस्थानमध्ये आयोजित ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील अनेक नेते आणि मंत्री सहभागी झाले होते. (Sonu Nigam displeasure on Rajasthan Chief Minister)

पण मुख्यमंत्री आणि त्यांचे इतर काही मंत्र्यांनी मध्येच शो सोडून गेल्याने सोनू निगमने आपली नाराजी व्यक्त केली आहे. सोनू निगमने या घटनेबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे. सोनू निगमने जयपूरमध्ये आयोजित या कार्यक्रमातील या घटनेविषयी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने असं म्हटलं आहे की, “नमस्कार, मी नुकतेच जयपूरमधील एका कॉन्सर्टमधून येत आहे. ‘रायझिंग राजस्थान’ पूर्ण करून मी परत येत आहे. खूप चांगले लोक आले होते. तो एक मोठा शो होता. राजस्थानची शान वाढवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. मुख्यमंत्री साहेब आणि राजस्थानातील अनेक प्रसिद्ध लोक सहभागी झाले होते. पण, मी पाहिलं की शोच्या मध्यातच मुख्यमंत्री साहेब आणि इतर अनेक बडे लोक उठून निघून गेले आणि ते निघून जाताच मोठे प्रतिनिधीही निघून गेले”.

View this post on Instagram

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial)

आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : दु:खी झालेल्या लीलाला येतेय एजेंची आठवण, दोघांच्या प्रेमाला नवा बहर, नव्या प्रोमोने वेधलं लक्ष

यापुढे गायक म्हणाला की, “त्यामुळे देशातील राजकारण्यांना माझे आवाहन आहे की, तुम्ही तुमच्या कलाकारांचा आदर करत नसाल तर बाहेरचे लोक काय करणार?. मी असं कुठेही पाहिलं नाही. अमेरिकेत कोणी कार्यक्रम करत असेल आणि राष्ट्राध्यक्ष बसला असेल तर तो मध्येच उठून जातो हे मी पाहिलेले नाही. जर त्याला जायचे असेल तर तो कळवतो, म्हणून माझी विनंती आहे की तुम्हाला उठून जायचे असेल तर मग तुम्ही येऊच नका किंवा असं मध्येच निघू नका. एखाद्या कलाकाराचा शो मध्येच सोडून जाणे अत्यंत अनादरकारक आणि देवी सरस्वती आणि कलेचा अपमान आहे”.

आणखी वाचा – अमोलच्या आनंदासाठी अप्पी-अर्जुन पुन्हा लग्नबंधनात अकडणार, सुपारीही फुटली, मालिकेच्या नवीन प्रोमोने वेधलं लक्ष

यापुढे सोनू निगमने असंही म्हटलं की, “हे सगळं माझ्या तेव्हा लक्षात आले नाही. पण शो संपल्यानंतर मला काही मॅसेज आले, ज्यात मला सांगण्यात आले की, तुम्ही असे शो करू नका. कारण कुणीही असंच उठून निघून गेला तर तो कलेचा अपमान आहे”. पुढे सोनू निगमने असंदेखील म्हटलं की, “मला माहित आहे की, तुम्ही सर्व व्यस्त आहात, तुम्हाला खूप काम आहे, म्हणून कृपया आधीच निघून जा”.सोनू निगमच्या या पोस्टवर चाहते आणि इंडस्ट्रीतील इतर लोक कमेंट करत आहेत . हे सांगण्याची क्षमता तुमच्यातच आहे, असे लोक म्हणत आहेत. काही लोक अगदी बरोबर लिहून त्याच्या मुद्द्याचे समर्थन करत आहेत.

Tags: Rajasthan Chief Minister left the cultural programSonu Nigam displeasure on Rajasthan Chief Ministersonu nigam latest news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
11 december 2024 daily horoscope wednesday is a special day for Aries, Cancer people, chances of money gain and promotion

11 December Horoscope : मेष, कर्क राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस खास, धनलाभ अन् बढतीची शक्यता, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.