टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका या प्रेक्षकांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग असतात. काही मालिका त्यांच्या वेगळ्या कथानकामुळे, कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या बनलेल्या असतात. अशा मालिकांपैकी म्हणजे एक म्हणजे ‘अप्पी माझी कलेक्टर’ ही मालिका आहे. अमोलच्या आजारपणामुळे ही मालिका सध्या नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. आजारामुळे सर्वजण त्याला आनंदी ठेवण्यासाठी त्याच्या प्रत्येक सगळ्या इच्छा आणि हट्ट पूर्ण करत आहेत. त्यामुळे ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही आता नव्या टप्प्यावर आहे. (Appi Amchi Collector serial update)
अमोलला त्याच्या आई-बाबांचे म्हणजेच अप्पी-अर्जुनचे पुन्हा एकदा लग्न झाल्याचे पाहायचे आहे. ही इच्छा त्याने व्यक्त केली असून आधी दोघांनी या लग्नाला नकार दिला होता. मात्र आता ते दोघे अमोलच्या आनंदासाठी पुन्हा एकदा लग्न करायला तयार झाले आहेत. मालिकेतील या कथानकाचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. “अमोलसाठी अप्पी-अर्जुनच्या पाहण्याचा कार्यक्रमसुद्धा आनंदात पार पडणार” असं कॅप्शन देत हा नवीन प्रोमो झी मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये अमोलसमोर अप्पी-अर्जुन यांचा पाहण्याचा कार्यक्रम केला जातो. यावेळी अप्पी अर्जुनला डोळ्याने इशारे करते. हीच गोष्ट अर्जुन अप्पीला सांगतो. त्यावर अमोलही हे कसले इशारे चाललेत असं म्हणतो. यादरम्यान, त्यांच्यात नौकझोक होते त्यावर अमोल चिडतो आणि अर्जुनही तिथून निघून जातो. त्याच्यापाथोपाठ अमोलही जातो आणि त्याला “लवकर हो म्हणा” असं म्हणतो. यावर अर्जुनही होकार देतो. त्यानंतर दोघांच्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होतानाचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
यामुळे अमोललाही आनंद होतो आणि तो आनंदाने नाचू लागतो. त्याला आनंदी बघून घरातील सर्व मंडळीही खुश होतात. मालिकेचा हा नवीन प्रोमो व मालिकेच्या कथानकात आलेला हा ट्विस्ट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. अनेक प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय पाहायला मिळणार? अप्पी-अर्जुन यांच्या लग्नामुळे अमोलच्या तब्येतीत फरक पडणार का? हे लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यासाठी अनेकजण वाट पाहत आहेत.