सध्या भारतात अनंत अंबानी व राधिका अंबानी यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळते. १२ जुलै रोजी दोघांचाही विवाहसोहळा पार पडणार आहे. त्याआधी दोघांच्याही लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नुकताच त्यांचा संगीत व हळदी समारंभ पार पडला आहे. या सोहळ्याला मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अनेकांचे फोटो व व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. सलमान खान, सारा अली खान, अनन्या पांडे, जान्हवी कपूर असे अनेक कलकार उपस्थित होते. संगीत सोहळ्याला अमेरिकन पॉपस्टार जस्टीन बीबरनेदेखील हजेरी लावली होती. त्याचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (rahul vaidya troll)
अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना १ जुलैपासून सुरुवात झाली. यामध्ये हळदी सोहळा दिमाखात पार पडला. यासाठी बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण व राहुल वैद्य यांना परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित केले होते. दोघेही त्यांच्या पत्नीबरोबर समारंभासाठी पोहोचले होते. उदित हे खूप वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. मात्र राहुलचे अधिक योगदान नसल्याचे बोलले गेले. त्यामुळे अंबानींच्या सोहळ्यामध्ये राहुलच्या उपस्थितीने मोठ्या प्रमाणात त्याला ट्रोल केले गेले.
अनंत व राधिकाच्या हळदी समारंभामध्ये राहुल व त्याची पत्नी व टेलिव्हिजन अभिनेत्री दिशा परमार यांना एकत्रित स्पॉट केले गेले. यावेळी दिशा व राहुल लाल रंगाच्या ड्रेसमध्ये असून दोघंही खूप छान दिसत होते. दोघांचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. हा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. राहुल व दिशाला ट्रोल करताना एका नेटकऱ्याने लिहिले की, “अरे याला कोणी बोलावलं?”, दुसऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, “भांडी घासायला बोलावलं आहे वाटतं?”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देताना लिहिले की, “माफ करा, पण मला नाही माहीत की हा कोण आहे”.
राहुल व दिशाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या राहुल ‘लाफ्टर शेफ्स’ या कार्यक्रमात दिसून येत आहे. तसेच दिशा सध्या कोणत्याही मालिकेत काम करत नाही आहे. याआधी ती ‘बडे अच्छे लगते है’ व ‘इस प्यार को क्या नाम दू’ या मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत दिसून आली होती.