रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी तंबाखू मळत नाही आणि…”, ‘नवरी मिळे…’मधील एजेच्या सूनेने शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाली, “तुम्ही कमेंट…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 9, 2024 | 1:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla serial fame actress Sharmila Shinde caught attention for caption she shared with her photo.

"मी तंबाखू मळत नाही आणि...", 'नवरी मिळे...'मधील एजेच्या सूनेने शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाली, "तुम्ही कमेंट..."

सोशल मीडिया हे कलाकारांसाठी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अशीच सोशल मीडियावर कायम सक्रीय असणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शर्मिला शिंदे. शर्मिला शिंदे ही सध्या झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती दुर्गा जहागीरदार हे पात्र साकारत असून तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.  शर्मिला शिंदे ही सोशल मीडियावबर अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

अशातच अभिनेत्रीने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शर्मिलाने तिचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. यात अभिनेत्रीने निळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला असून या फोटोंत ती खूपच सुंदर दिसत आहे. मात्र या फोटोखाली तिने लिहिलेल्या कॅप्शनमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तिने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये तिने तंबाखू मळत असल्याचे भासत आहे. यामुळे तिने या फोटोला साजेसं असं “नाही मी तंबाकू मळत नाहीये. त्यामुळे यावर तशी कमेंट करु नका” असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Sharmila Rajaram Shinde (@sharmilarajaramshindeactor)

आणखी वाचा – “तुमच्या अ’चूक’ अंदाजामुळे…”, वेधशाळेच्या पावसावरील अंदाजाबद्दल सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट, म्हणाली, “लोक बाहेर पडली नाहीत आणि…”

तिच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी या फोटोखाली अनेक मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. या पोस्टखाली सहअभिनेत्री सानिका काशीकरने “पहिला फोटो मशेरी लावायच्या आधीचा आणि दूसरा फोटो मशेरी लावल्यानंतरचा आहे” असं म्हटलं आहे. तर एकाने “तंबाखू आधीच मळून झाला आहे, फोटो नंतर काढला आहे” अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी शर्मिलाचा हा फोटो आवडल्याच्या अनेक कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा – “शिवीगाळ, मारहाण केली अन्…”, लग्नानंतर गर्लफ्रेंडबरोबर पकडल्यानंतर शत्रुघ्न सिन्हांच्या पत्नीने उचललं होतं टोकाचं पाऊल, म्हणलेले, “मुलं असताना…”

दरम्यान, शर्मिलाने याआधीही अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ‘पुढचं पाऊल’ मालिकेतील तिची रुपाली ही भूमिका चांगलीच गाजली. यानंतर तिने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. मराठीसह तिने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.         

Tags: marathi entertainment newsNavri Mile HitlerlaSharmila Shinde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Arman Malik And Kritika Malik Rommance

Bigg Boss Ott 3 : अरमान मलिकने मर्यादाच ओलांडली, बायकोबरोबर घरातच बाथरुम परिसरात रोमान्स, स्वतःकडे खेचलं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.