प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेत्री दिशा परमार आणि गायक राहुल वैद्य यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. कारण, या जोडीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. दिशाने एका मुलीला जन्म दिला असून गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी या जोडीने ही आनंदाची बातमी दिली आहे. राहुलने ही बातमी सोशल मीडियाद्वारे ही माहिती देताच दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Rahul Vaidya and Disha Parmar blessed with Baby Girl)
राहुल वैद्यच्या घरी लक्ष्मी आल्याचे सांगत बाळ व बाळाच्या आईची प्रकृती उत्तम असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याचबरोबर त्याने डॉक्टरांचे आभार देखील या पोस्टमध्ये मानले आहेत. राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तो यामध्ये म्हणाला, “लक्ष्मी आली आहे. आम्ही एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बाळ व बाळाची आई दोघांची प्रकृती उत्तम असून मी यासाठी आमच्या डॉक्टरांचे मनापासून आभार मानतो. आम्ही खूप खुश असून बाळावर तुमचे आशीर्वाद असू द्या.” दरम्यान, या पोस्टवर टीव्ही विश्वातील कलाकारांसह चाहत्यांनी दोघांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
हे देखील वाचा – गणेशोत्सवानिमित्त हार्दिक जोशीची स्पेशल पोस्ट, बाप्पाचा फोटो शेअर करत म्हणाला, “बायकोचा पहिला…”
काही दिवसांपूर्वी राहुल आणि दिशाने इन्स्टाग्रामवर बेबी बंपचा फोटो शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. यानंतर अभिनेत्याच्या घरी थाटामाटात दिशाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. ऐन सणासुदीच्या दिवसांत या जोडीच्या घरी बाळाचं आगमन झाल्याने सध्या दोन्ही कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
हे देखील वाचा – ‘पायलटची खुर्ची, माॅनिटर, टेक ऑफ लॅंडिंगची दांडी….’, एका स्माईलने संकर्षणने घेतला कधीही न घेतलेला अनुभव, म्हणाला, “विमानाच्या केबिनमध्ये…”
‘इंडियन आयडॉल’ या सिंगिंग शोमधून प्रसिद्ध झालेला गायक राहुल वैद्य व अभिनेत्री दिशा परमार हे लग्नापूर्वी अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण, जेव्हा ‘बिग बॉस १४’ या शोमध्ये सहभागी झाला होता. तेव्हा त्याने दिशा परमारला प्रपोज केले होते. त्यानंतर हे दोघं १६ जुलै २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकले.